• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासगावात पोलीस निरीक्षकांनीच झळकवला बेकायदा डिजिटल फलक

नगरपालिकेचा नियम फाट्यावर : पालिकेचा महसूल बुडवला

Admin by Admin
June 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, शोध पत्रकारिता
1 min read
0
तासगावात पोलीस निरीक्षकांनीच झळकवला बेकायदा डिजिटल फलक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी /तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी शहरातील गणपती मंदिर चौकात बेकायदा डिजिटल फलक लावला आहे. हा फलक लावण्यासाठी त्यांनी नगरपालिकेची परवानगी घेतली नाही. नगरपालिकेला द्यावा लागणारा महसूल बुडवण्यासाठी निंभोरे यांनी नियम फाट्यावर मारल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक तासगाव शहरात गल्ली – बोळात दररोज विनापरवाना डिजिटल फलक लावले जात आहेत. नगरपालिकेचे त्यावर कसलेही नियंत्रण नाही. चौकाचौकात, मोक्याच्या ठिकाणी पालिकेच्या नाकावर टिचून हे फलक झळकवले जात आहेत. एकदा लावलेला फलक महिनामहिना तिथेच असतो. परिणामी शहराचे दिवसेंदिवस विद्रुपीकरण होत आहे. शिवाय मुख्य रस्त्यांच्या कडेला लावलेल्या या फलकांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.

डिजिटल फलक लावण्याबाबत नगरपालिकेने नियमावली तयार केली आहे. कोणालाही फलक लावण्यासाठी जास्तीत जास्त पाच दिवसांचा परवाना दिला जातो. त्यासाठी नगरपालिकेकडे रीतसर अर्ज करावा लागतो. जो फलक लावणार आहे त्याची डिझाईन या अर्जासोबत जोडावी लागते. ही डिझाईन तपासून त्यात काही आक्षेपार्ह नसल्याची खात्री करून पालिका फलक लावण्यासाठी परवानगी देते. त्यासाठी प्रतिदिन प्रतिफलक 100 रुपये आकारले जातात. यानंतर फलक लावताना त्यावर परवानगी क्रमांक तसेच परवानगीचा कालावधी टाकावा लागतो.

मात्र पालिकेचा हा नियम कागदावर आहे. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पालिकेचा नियम पायदळी तुडवून कोणीही उठसुठ चौकाचौकात डिजिटल फलक झळकावत आहे. क्वचित एखादाच परवानगी काढून डिजिटल लावत असेल. सध्या शहरातील जवळजवळ सगळेच डिजिटल फलक विनापरवाना आहेत. यातून पालिकेचा वर्षाकाठी लाखोंचा महसूल बुडत आहे. दरवर्षी पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना प्रशासन मात्र झोपेतच आहे.

सर्वसामान्य लोक, राजकीय टगे पालिकेचा डिजिटल लावण्याबाबतचा नियम कोलून लावत असताना आता चक्क पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनीही पालिकेचा नियम फाट्यावर मारला आहे. शहरातील गणपती मंदिर चौकात निंभोरे यांनी स्वतःची छबी झळकवून एक डिजिटल फलक लावला आहे. निंभोरे यांचे मित्र पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण यादव यांची मुलगी प्रतीक्षा हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पाटबंधारे विभागात सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. निश्चीतपणाने ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रतीक्षा हिचे याबद्दल अभिनंदन करण्यात काहीच गैर नाही. आपल्या मित्राच्या कन्येची ‘एमपीएससी’ तून निवड झाल्याने निंभोरे यांना साहजिकच आनंद झाला असेल. त्यांनी आनंद व्यक्तही करायला हवा. त्यातून त्यांनी यशस्वी झालेल्या प्रतीक्षा हिचे अभिनंदन करणारा फलक लावला त्याबद्दलही कोणाचे दुमत असण्याचे काम नाही.

पण, मुद्दा हा आहे की निंभोरे हे सध्या तासगावचे पोलीस निरीक्षक आहेत. त्यांनी कायद्यानेच वागले पाहिजे. त्यांनीच जर नियम, कायदा मोडला तर सर्वसामान्य लोकांना कायदा व नियमाची भाषा बोलून दाखवायचा त्यांना नैतिक अधिकार राहत नाही. एखाद्या टपोऱ्या व्यक्तिप्रमाणे विनापरवाना डिजिटल तेही स्वतःची छबी झळकवून लावणे त्यांना शोभत नाही.

गेले दोन – तीन दिवस झाले निंभोरे यांचे हे विनापरवाना डिजिटल झळकत असताना पालिकेचे कर्तबगार अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. एखाद्या सर्वसामान्याच्या बाबतीत नियमावर बोट ठेवणाऱ्या पालिका प्रशासनाला निंभोरे यांची ही दांडगावशाही दिसत नाही का, असा सवाल व्यक्त होत आहे.

गेल्या चार – पाच दिवसात कोणालाही डिजिटल लावण्याची परवानगी दिली नाही : आयुब मणेर

याबाबत नगरपालिकेतील आयुब मनेर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘डिजिटलसाठी परवानगी देण्याचे काम माझ्याकडेच आहे. पालिकेच्या वतीने जास्तीत जास्त पाच दिवसांचा परवाना दिला जातो. बस स्टँड चौक सोडून इतर ठिकाणी डिजिटल लावण्यास हा परवाना दिला जातो. त्यासाठी प्रतिदिन प्रति फलक 100 रुपये आकारले जातात. मात्र गेल्या चार-पाच दिवसात पालिकेने कोणालाही डिजिटल लावण्याचा परवाना दिलेला नाही’. यावरून पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी लावलेला फलक बेकायदेशीर व विनापरवाना असल्याचे सिद्ध होत आहे.

Previous Post

खबऱ्याच्या दणक्यानंतर लगेचच गायब झालेलं प्रकरण सापडलं

Next Post

सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच

सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group