• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बनावट कागदपत्राच्या आधारे घर हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

Admin by Admin
May 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बनावट कागदपत्राच्या आधारे घर हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जत: बनावट कागदपत्र तयार करून जत नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी व खोट्या कागदपत्राच्या आधारे विद्युत कनेक्शन घेतल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

शांताबाई साऊबा साळे, दऱ्याबा साऊबा साळे, प्रकाश साऊबा साळे सर्व (रा.जत) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद सुरेश साऊबा साळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, नगरपालिका हद्दीतील मालमत्तेचा बनावट उतारा करून त्यावर मुख्याधिकारी यांचा बनावट शिक्का व सही करून घेतला. सदरचा प्रकार शांताबाई साळे, दर्याप्पा साळे यांनी नातेवाईक सुरेश साळे यांचे घर हडपण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार सुरेश साळे यांच्या लक्षात येताच त्यांनी अधिक चौकशी केली असता बनावट कागदपत्राचा वापर करून विद्युत कनेक्शन घेतले आहे. विद्युत कनेक्शनच्या आधारे मालकी व कब्जा करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. सर्व कागदपत्र साळे यांनी जमा करून महावितरण मध्ये वापरलेले कागदपत्र बनावट असल्याचे सांगत जत पोलिसात फसवणूक, बनावट दस्तऐवज, कागदपत्राची अफरातफर केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहे.

घटनेने तालुक्यात खळबळ

जत तालुक्यात सह तालुक्यातील फसवणूक करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेक मोठे लँड माफिया यांचा समावेश आहे. यातूनच जत तालुक्यात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. कागदपत्रात छेडछाड करून मालमत्ता हडप करण्याचा सपाटा सुरू आहे. भविष्यात यातूनच मोठा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचा गुन्हा दाखल होताच शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post

सांगली माधवनगर रस्त्यावर दुचाकी व टेम्पोचा अपघात दोघेजण ठार

Next Post

कर्नाटकात भाजपचा बाजार उठला!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!

कर्नाटकात भाजपचा बाजार उठला!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group