• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यातील दोन कर्तबगार पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Admin by Admin
April 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली जिल्ह्यातील दोन कर्तबगार पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : गुन्ह्यांचा तातडीने तपास आणि पोलिस कामकाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलिस दलातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

संजय तुळशीराम संकपाळ आणि मुदस्सर अब्दुलकय्यूम पाथरवट असे पदक जाहीर झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी याबाबतची घोषणा केली.

पोलिस दलात कार्यरत असताना केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्यपदकानंतर याबाबतची घोषणा केली जाते. बुधवारी राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी याबाबतची घोषणा केली. त्यात जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

संजय संकपाळ यांनी मिरज शहर, सांगली शहर, विश्रामबाग, कवठेमहांकाळ आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केले असून सध्या ते पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. तर पाथरवट यांनी इस्लामपूर, विशेष पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, संजयनगर येथे काम केले असून सध्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात ते कार्यरत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दोघांचेही अभिनंदन केले.

Previous Post

कुपवाड मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..!

Next Post

कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड

कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group