• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

काँग्रेसला मोठा झटका; “या” माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश..!

Admin by Admin
April 7, 2023
in राजकीय
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Breaking : khabarya media: Kiran Kumar Reddy to Join BJP : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील मोठे राज्य असलेल्या आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

किरण कुमार यांनी आज (शुक्रवारी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक राज्य काँग्रेसपासून दूर जात आहेत,’ असे रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला तेव्हा म्हटलं होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसचे लोकसभा खासदार मणिकम टागोर म्हणाले होते की, ज्या व्यक्तींना पक्षाकडून खूप काही लाभ मिळाला, ते आता भाजपमध्ये जात आहेत.

कांग्रेस आलाकमान के गलत फैसलों की वजह से राज्य दर राज्य पार्टी टूट रही, यह एक राज्य की बात नहीं। एक पुरानी कहानी है कि मेरा राजा बहुत बुद्धिमान है वह अपने आप नहीं सोचता और न ही किसी का सुझाव मानता है। आप सबको पता चल गया होगा कि मैं क्या कहना चाहता हूं: पूर्व मुख्यमंत्री किरण… https://t.co/FhjX3EwH4y pic.twitter.com/gDL7ezAvVg

— ANI_HindiNews (@AHindinews) April 7, 2023

किरण कुमार रेड्डी यांनी ११ मार्च रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने आंध्रप्रदेशचे विभाजन करुन तेलगंणा राज्याची निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला रेड्डी यांनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत ‘जय समैक्य आंध्र पार्टी’ ची स्थापना केली होती. पण २०१८ मध्ये पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

रेड्डी यांनी १९८९ मध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली होती. ते वायलपाडू येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडूण आले होते. रेड्डी हे १९९९ आणि २००४ मध्ये एकाच मतदारसंघातून तर २००९ मध्ये पिलेरु विधानसभा मतदार संघातून आमदार झाले होते. २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आयएस राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांनी २०१०मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशचे नेतृत्व केले होते.

Previous Post

प्रेमात शरीरसुखासाठी कधीकधी केलेली बळजबरी बलात्कार नाही- उच्च न्यायालय.

Next Post

“पच्चीस दिन मे डबल देतू, मैं फसानेवाला आदमी नहीं;” म्हणत.. सव्वा कोटी रुपये गोळा केले.. अन्

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“पच्चीस दिन मे डबल देतू, मैं फसानेवाला आदमी नहीं;” म्हणत.. सव्वा कोटी रुपये गोळा केले.. अन्

"पच्चीस दिन मे डबल देतू, मैं फसानेवाला आदमी नहीं;" म्हणत.. सव्वा कोटी रुपये गोळा केले.. अन्

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group