• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जत ब्रेकिंग | मारोळीच्या जंगलात अडवून ३जणांवर सशस्त्र हल्ला, तलवारीने हात- पाय तोडले

Admin by Admin
March 28, 2022
in क्राईम
1 min read
0
जत ब्रेकिंग | मारोळीच्या जंगलात अडवून ३जणांवर सशस्त्र हल्ला, तलवारीने हात- पाय तोडले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत : माराेळी (ता. मंगळवेढा) येथील वनक्षेत्रात जाडरबाेबलाद (ता. जत) येथील दाेघा भावांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. तलवारीने वार करीत हात-पाय ताेडण्यात आले. जंगलात दबा धरून बसलेल्या हल्लेखाेरांनी भावकीतील अंतर्गत वाद व शेतजमिनीवरून सुरू असलेल्या संघर्षातून हा हल्ला केल्याचे समाेर येत आहे.रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

जखमींमध्ये विठ्ठल रामचंद्र बरूर, दयानंद मल्लेशप्पा बरूर व महादेव रामचंद्र बरूर (तिघेही, रा. जाडरबाेबलाद) यांचा समावेश आहे. त्यांना उपचारार्थ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील माराेळी व जत तालुक्यातील जाडरबाेबलाद दरम्यान वन विभागाची जागा आहे. जंगल असल्याने नेहमीच हा परिसर निर्जन असताे. जाडरबाेबलाद येथील बरुर भावकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविवारी विठ्ठल बरूर, दयानंद बरूर व महादेव बरूर हे तिघे एकाच दुचाकींवरून जाडरबोबलाद जवळच असणाऱ्या नंदूर येथे एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले हाेते.

अंत्यविधी आटाेपून परत येत असताना वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांना अडवून तलवारीने हल्ला चढविला. त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उमदी व मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलीस ठाण्यात याची नोंद नव्हती.

जमिनीचा वाद

हल्लेखाेरांचा जखमींबरोबर मागील काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांच्यात शेतात नांगर लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या कारणावरूनच ही घटना घडली असावी असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला.

Previous Post

पोलिसांची धडक कारवाई..! मंगळवेढ्यात वाळू चोरी प्रकरणी बांधकाम मालकासह एजंट, टमटम चालक व मालकाविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

… अखेर वाळू तस्करांवरील कारवाईचा ‘दर’ ठरला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
… अखेर वाळू तस्करांवरील कारवाईचा ‘दर’ ठरला

… अखेर वाळू तस्करांवरील कारवाईचा ‘दर’ ठरला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group