पारनेर : खबऱ्या प्रतिनिधी: तालुक्यातील निघोज येथील पोलिस चौकीत विनाकारण प्रवेश करून पोलिस अधिकार्याच्या खूचीर्र्त बसल्याप्रकरणी आरोपी राहुल भाऊसाहेब वराळ (वय 32 ) याला पारनेरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोराडे – कपूर यांनी 500 दंड पाच दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत माहिती अशी ः निघोज येथील एक महिला 8 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता निघोज पोलिस चौकीत तक्रार करीत असताना राहुल वराळ हा पोलिस चौकीत येत पोलिस अधिकार्याच्या खूर्चीत बसला. त्यानंतर त्याने महिलेच्या तक्रारीची लगेच दखल घ्या, असा सल्ला ठाणे प्रमुखाला दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकजागृती सामाजिक संस्थेने पोलिस महानिरीक्षक व अधीक्षकांकडे याबाबत लेखी तक्रार करून दोषींवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा ईशारा दिला. त्यानंतर लगेचच निघोज पोलिस चौकीचे ठाणे प्रमुख हवालदार गणेश डहाळे यांनी राहुल वराळ विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वराळला
पारनेर न्यायालयासमोर हजर असता, राहुल वराळ याने न्यायालयासमोर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसाच्या फिर्यादीवरून पारनेर न्यायालयाने राहुल वराळ याला दोषी ठरवून पाचशे रुपये दंड किंवा दंड न भरल्यास पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी राहुल वराळ याने पाचशे रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्याने त्याची पाच दिवसांच्या कारावासापासून सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. फिर्याद दाखल झाली.
राहुल वराळवर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. निघोज चौकीत वराळसह आरोपींची नेहमीच वर्दळ असते. असे प्रकार यापुढे थांबले पाहिजेत. लोकजागृतीच्या तक्रारीनंतर पोलिस व पारनेर न्यायालयाने केलेल्या कारवाईवर समाधानी आहोत .
–कांता लंके सचिव, लोकजागृती सामाजिक संस्था

