• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली लोकसभेला आघाडी कडून “प्रतीकच”..!

प्रतीक काँग्रेसचे की राष्ट्रवादीचे..?

Admin by Admin
December 14, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली लोकसभेला आघाडी कडून “प्रतीकच”..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : अलीकडे राज्यातील राजकीय वातावरण फारच अस्थिर आहे. त्यातच सर्व लोकप्रतिनिधींना आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. येत्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात प्रतिकच नाव फायनल होणार असल्याचे दिसून येत आहे. पण हा प्रतिक काँग्रेसचा नसून राष्ट्रवादीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. विद्यमान आमदार मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत. तर अन्य इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी रंगीत तालीम घ्यायचे ठरवले आहेत. त्यासाठी विद्यमान आमदार यांच्यासह इच्छुक तयारीला लागले आहेत.

परंतु सांगली लोकसभा मतदारसंघात मात्र राजकारणात चाणक्य समजल्या जाणाऱ्या साहेबांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे .या साहेबांनी काँग्रेस मधील फूट लक्षात घेऊन पद्धतशीर पाऊले उचली आहेत. त्यातच मागील निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा आणि राष्ट्रवादीची पहिल्यांदा झालेल्या आघाडीत काँग्रेसने स्वतःकडे ठेवलेला लोकसभा मतदारसंघ शेतकरी संघटनेला द्यावा लागला.

काँग्रेसचे प्रबळ दावेदार असलेल्या दादा घराण्यानेच मतदार संघ सोडून दिला. केवळ इतक्यावरच न थांबता दादा घराण्यातील विशाल पाटील यांनीही निवडणूक शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवर लढवली तेथेच हा मतदारसंघ काँग्रेस किंबहुना दादा घराण्याच्या हातून निसटला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याचीच वाट पाहत होते. त्यांनी आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा ,यासाठी फिल्डिंग लावली आहे . येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.

त्यामुळेच भविष्यात चांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस दावा सांगण्याची शक्यता आहे.आणि त्यांचा उमेदवार प्रतीक जयंत पाटील हाच असणार यात शंका नाही.

दादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सध्या राजकीय संन्यास घेतला आहे. विशाल पाटील कार्यरत आहेत. पण ,त्यांना मुंबई सुटत नाही. नांद्रे सारख्या दादा घराण्याशी एकनिष्ठ गावात त्या घराण्याचा राजकीय वारसदार एका कार्यक्रमात जाऊ शकत नाही. आणि ग्रामस्थांनी सांगली विधानसभा मतदार संघातील दुसऱ्या नेत्याला त्या कार्यक्रमात बोलावले, म्हणून आगपाखड करतो. असा नेता लोकसभेत काय नेतृत्व करणार..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकंदरीत सध्याचे वातावरण पाहता लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात प्रतीक असणार आहे. पण तो प्रतीक राष्ट्रवादी की काँग्रेसचा हे लवकरच स्पष्ट होईल.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ३ जानेवारीला इस्लामपुर दौरा.

Next Post

सांगलीत पोलिसाला मारहाण, रिक्षा चालकावर गुन्हा दाखल .

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत पोलिसाला मारहाण, रिक्षा चालकावर गुन्हा दाखल .

सांगलीत पोलिसाला मारहाण, रिक्षा चालकावर गुन्हा दाखल .

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group