• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हॉटेल रहीमतुल्लाची जागा शासनाचीच..? मिरजकरांत उलट सुलट चर्चा..!

- अखेर मिरजेतील ते झाड आणि हॉटेल रहीमतुल्लाच अतिक्रमण काढलं : मिरज शहर परिवर्तन समितीचे रस्त्यावर उतरून आंदोलन : तर अतिक्रमण काढण्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई केली जाईल माजी महापौर विवेक कांबळे यांचा इशारा :

Admin by Admin
December 9, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
हॉटेल रहीमतुल्लाची जागा शासनाचीच..? मिरजकरांत उलट सुलट चर्चा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज- खबऱ्या प्रतिनिधी: अखेरीस मिरजेतील ते झाड आणि त्या हॉटेल रहीमतुल्ला या हॉटेलचे अतिक्रमण काढलं आहे. या अतिक्रमना विरोधात मिरज शहर परिवर्तन समितीचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. वादग्रस्त झाड आणि अतिक्रमण काढल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा मिरज शहर परिवर्तन समितीचे प्रमुख मुस्तफा बुजरूक यांनी दिला. अतिक्रमणास विरोध करू नका असं आवाहन माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी जनतेला केलं. तर अतिक्रमण काढण्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई केली जाईल असा इशारा माजी महापौर विवेक कांबळे यांनी दिला. तर सदर हॉटेलची जागा शासनाची असून हॉटेल मालक चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढण्यास विरोध करत आहे असा आरोप माजी नगरसेवक अय्याज नायकवडी यांनी केला आहे. सुरवातीला हॉटेल मालक चालकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. अधिकारी यांच्या सोबत वादावादी झाली. काही काळ या ठिकाणी वातावरण तंग झालं होतं. मात्र आंदोलक, जनतेचा रेटा यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात जेसीबी चालवला तर काही बांधकाम स्वतः हुन काढून घेण्यात आल. मिरज शहर परिवर्तन समितीच्या आंदोलनास यश आलं आणि झाड आणि ते अतिक्रमण काढण्यात आलं.

सांगली महापालिकेच्या वतीने मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड वरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली. मात्र अतिक्रमण काढण्याची मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली. मोठ्या हॉटेल व्यवसायिकांचं अतिक्रमण काढला जात नाही मात्र छोट्या व्यावसायिकांच्या वर कारवाई केली जात असल्याचा आरोप झाला. सरसकट अतिक्रमणाची मोहीम राबवा अशी मागणी करत मिरज परिवर्तन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. सुरुवातीला नारमाईची भूमिका घेणारे अधिकाऱ्यांनी सुद्धा कार्यकर्ते आणि जनतेचा रोष बघून कारवाई करण्यास सुरुवात केली.

दरम्यान सदरची जागा आमच्या मालकीची असून आमच्यावर होत असलेल्या आरोप चुकीचे आहेत असं स्पष्टीकरण हॉटेल रहमतुलाचे चालक वाहिद तहसीलदार यांनी दिली आहे.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2022/12/VID-20221208-WA0201.mp4

 

वाहिद तहसीलदार (हॉटेल रहमतुलाचे चालक)

Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार

Next Post

जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त..? जोरदार चर्चा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त..? जोरदार चर्चा.

जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त..? जोरदार चर्चा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group