• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“बेईमानीचं सरकार जास्त काळ चालत नाही म्हणूनच महाविकास आघाडीला अडीच वर्षात सत्ता गमवावी लागली.”

Admin by Admin
November 13, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
“बेईमानीचं सरकार जास्त काळ चालत नाही म्हणूनच महाविकास आघाडीला अडीच वर्षात सत्ता गमवावी लागली.”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सांगली दौऱ्यावर आहेत. आज दिवसभरात विविध विविध कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवणार आहेत. सांगली जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी बैठका, कार्यक्रमांचे उद्घाटन याची सुरुवात करण्याअगोदर त्यांनी सांगलीचे आराध्य दैवत श्रीगणेशाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन सुरुवात केली. यावेळी गणपती पंचायतन ट्रस्टने बावनकुळे, खाडे व इतर उपस्थित आमदारांचा सत्कार केला. त्यानंतर बावनकुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर विविध विषयांवर पत्रकार परिषद घेतली.

बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

👉भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा काढत असताना सामान्य कार्यकर्त्यांचा व स्थानिक नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय यावरूनच काँग्रेसला किती गळती लागले हे समजते.

👉राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा स्वभाव सत्ते शिवाय राहण्याचा नाही. सत्तेपासून पैसा- पैशापासून सत्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण असल्यामुळे, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये नेता मोठा होतोय कार्यकर्ता मात्र आहे तसाच राहतो.

👉राष्ट्रवादीमध्ये घराणेशाहीचे राजकारण चालू आहे. आमदाराचा मुलगा आमदार अन् खासदाराचा मुलगा खासदार दिसतोय.

👉शिवसेनेच्या विकासाकरिता गजानन कीर्तिकर यांनी खूप प्रयत्न केले. ते बुलढाणा पासून नागपूर पर्यंत पायी निघताना मी पाहिले. कीर्तीकरांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडला यावरती उद्धवजींनी चिंतन करणे गरजेचे आहे.

👉उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार खासदाराच्या घरी गेल्याशिवाय आता पर्याय नाही. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते केवळ नाराजीमुळे त्यांचा पक्ष सोडणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

👉एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार यांची शिवसेना-भाजपची युती भविष्यामध्ये विकास घडवणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

👉उद्धवजींनी राष्ट्रवादी व काँग्रेसला जवळ केलं . परंतु ,एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांची युती होती त्याचा विचार करून शिवसेना संपते लक्षात आल्यानंतरच योग्य निर्णय घेतला आणि भाजपच्या पक्ष नेतृत्वाने त्यांना सर्वोच्च पद देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले.

👉काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात बऱ्याच योजना आल्या परंतु सर्वसामान्यांपर्यंत माहिती झाल्या नाहीत. आमच्या पक्षामार्फत आम्ही त्या जनतेपर्यंत पोहोचवणार.बेईमानीचं सरकार असो किंवा व्यवसाय जास्त काळ कधीच चालत नाही आणि बेईमानीचं सरकार असल्यामुळेच महाविकास आघाडीला अडीच वर्षात सत्ता गमवावी लागली. असेही बावनकुळे पत्रकार परिषदेत म्हणाले.

भाजपच्या जिल्हा कोर कमिटी यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, भाजप नेते मकरंद देशपांडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, भाजप नेते पृथ्वीराज देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर,नीता केळकर, स्वाती शिंदे, मोहन वनखंडे, दीपक शिंदे, शेखर इनामदार, नितीन शिंदे, त्याचबरोबर अजिंक्य पाटील यांच्यासहित भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

मिरजेत पावणे दोन लाखाची गोवा बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली.

Next Post

सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण ; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण ; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका.

सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण ; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group