• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत पावणे दोन लाखाची गोवा बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली.

हॉटेल चालकाला अटक,बार मध्ये गोवा बनावटीची दारू विकणाऱ्या चालकांचे धाबे दणाणले.

Admin by Admin
November 12, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत पावणे दोन लाखाची गोवा बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / गोवा बनावटीच्या मद्याची विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेल्या दोन ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापे टाकून एकास अटक केली. कमाल गुलझार शेख (वय 36 रा. , महाराष्ट्र लॉन्स समोर, कुपवाड रस्ता, मिरज) असे त्याचे नाव आहे. या ठिकाणाहून 1 लाख 83 हजार 730 रुपयांचे गोल्डन एसीई ब्ल्यू व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 408 बाटल्या जप्त  केल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमाल शेख याने गोडाउन आणि महाराष्ट्र लॉन्समध्ये गोवा बनावटीच्या मद्याचा साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक आर. एस. खंडागळे, दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील, उपनिरीक्षक ए. आर. नायकुडे  यांच्या पथकाने विजयनगर येथील गुलफाम इमारतीमधील गोडाउनमध्ये आणि मिरज-कुपवाड रस्त्यावरील महाराष्ट्र लॉन्समध्ये शनिवारी सकाळी 7 वाजता छापा टाकला.

छाप्या दरम्यान भरारी पथकाला गोवा बनावटीच्या एसीई ब्ल्यू फाईन व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 408 बाटल्या मिळून आल्या. पथकाने सर्व दारूच्या बाटल्या जप्त करून कमाल शेख याला अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेला मद्याचा साठा कोठून आणला, कोणाच्या नावावर आणण्यात आला याची चौकशी करण्यात येत आहे. त्या सर्वांवर देखील कारवाई करून त्यांना अटक करण्यात येणार असल्याचेे भरारी पथकाकडून सांगण्यात आले.

तपासणी अहवाल आल्यानंतर त्या बाटल्या देखील जप्त करण्यात येणार असल्याचे निरीक्षक खंडागळे यांनी सांगिले.सांगली मिरजेतील अनेक बार आणि परमिटरूम मध्ये गोवा बनावटीची दारू मिळत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या असल्याचे समजते. त्यानुसार राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे.

Previous Post

शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी सिबिल स्कोर खरच गरजेचा आहे का? पीक कर्जासाठी सिबिल स्कोर रद्द होईल का?

Next Post

“बेईमानीचं सरकार जास्त काळ चालत नाही म्हणूनच महाविकास आघाडीला अडीच वर्षात सत्ता गमवावी लागली.”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“बेईमानीचं सरकार जास्त काळ चालत नाही म्हणूनच महाविकास आघाडीला अडीच वर्षात सत्ता गमवावी लागली.”

"बेईमानीचं सरकार जास्त काळ चालत नाही म्हणूनच महाविकास आघाडीला अडीच वर्षात सत्ता गमवावी लागली."

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group