• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जितेंद्र आव्हाड यांना अटक; ‘हर हर महादेव’ शो बंद पाडणे अंगलट

Admin by Admin
November 11, 2022
in राजकीय
1 min read
0
जितेंद्र आव्हाड यांना अटक; ‘हर हर महादेव’ शो बंद पाडणे अंगलट
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हर, हर महादेव चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे शिवाजी महाराजांची बदनामी झाली आहे. या बदनामीला विरोध करत असल्याने अटकेची कारवाई होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकार मला शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यापासून रोखत आहे, हे सरकार कोणाचे आहे हे स्पष्ट होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.

ही सरकारची दडपशाही : आव्हाड

राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांनी लावलेली कलमे ही जामिनपात्र गुन्हे होते. त्यानंतर आणखी काही कलमांतंर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची दडपशाही असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Previous Post

मिरजेतील ढेरे टोळी तडीपार; पोलिसप्रमुखांचा दणका

Next Post

संपादकीय : न्यायव्यवस्थेकडून ईडीचे वस्त्रहरण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संपादकीय : न्यायव्यवस्थेकडून ईडीचे वस्त्रहरण

संपादकीय : न्यायव्यवस्थेकडून ईडीचे वस्त्रहरण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group