• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दिवाळीच्या तोंडावर हद्दपार : रेकॉर्डवरील दोन आरोपींना पोलिसांचा दणका; तीन जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश .

Admin by Admin
October 13, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दिवाळीच्या तोंडावर हद्दपार : रेकॉर्डवरील दोन आरोपींना पोलिसांचा दणका; तीन जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश .
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा; खबऱ्या प्रतिनिधी : विटा पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील दोन आरोपींना सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.

रोहित युवराज भिंगारदेवे आणि राहुल चंद्रकांत जाधव अशी त्यांची नावे असून ते अनुक्रमे फुलेनगर आणि साळशिंगे, विटा (Sangli) येथील रहिवाशी आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांनी चोरी, दरोडे, खूनाचा प्रयत्न आदी प्रकारातील गुन्ह्यांच्या रेकॉर्डवरील आरोपींना हद्दपार करा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रोहित युवराज भिंगारदेवे आणि राहुल चंद्रकांत जाधव या दोघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले होते. या दोघांवर जबरी चोरी, घरफोडी, मारामारी तसेच खंडणी, सावकारी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. (Sangli)

या दोघांविरूद्धच्या दाखल गुन्ह्यानंतर त्यांना अटक झाली. मात्र न्यायालयामधून जामिनावर सुटल्यानंतरही पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवितास आणि मालमत्तेस धोका पोहचत आहे. शिवाय जनमानसात आणि विटा परीसरातील नागरीकांमध्ये याचा विपरीत परीणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्यांची माहिती एकत्र करुन त्यांना हद्दपार करण्यात यावे अशा सूचना दिल्या होत्या. त्यानूसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अंतर्गत रोहित भिंगारदेवे आणि राहुल जाधव या दोघांना सांगली, सातारा, कोल्हापूर या ३ जिल्ह्यांमधून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस नाईक नवनाथ देवकते, पुंडलिक कुंभार, सुरेश भोसले, शशिकांत माळी, सागर निकम यांनी पूर्ण केली आहे.

Previous Post

शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर मोक्का लावा , जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा…

Next Post

ब्रेकिंग | एकनाथ खडसेंची प्रकृती अस्वस्थ, पोलीस ठाण्यातच केली वैद्यकीय चाचणी…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | एकनाथ खडसेंची प्रकृती अस्वस्थ, पोलीस ठाण्यातच केली वैद्यकीय चाचणी…

ब्रेकिंग | एकनाथ खडसेंची प्रकृती अस्वस्थ, पोलीस ठाण्यातच केली वैद्यकीय चाचणी...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group