• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर मोक्का लावा , जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा…

Admin by Admin
October 13, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर मोक्का लावा , जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी/ शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने जिल्ह्यातील नागरिकांना अनेक कंपन्यांनी हजारो कोटींचा गंडा घातला आहे.

या कंपन्यांची चौकशी करून दोषीवर मोका कायद्यान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या कंपन्यांचे पेव जिल्ह्यात फुटले आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा चुना या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लावला आहे. पोलिसांमध्ये रोज गुन्हे दाखल होत आहेत. कंपन्यांच्या संचालकांना अटकही करण्यात आली आहे. मात्र ठोस कारवाई होत नाही. गुंतवणूकदारांचे पैसे कसे मिळणार याचे उत्तर पोलिसांच्याकडे नाही. कंपन्यांच्या संचालकांनी गुंतवणूकदारांचे पैसे हवालामार्फत परदेशात पाठविल्याची चर्चा आहे.

लोकप्रतिनिधींनी तपास यंत्रणांच्या सहाय्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. गंडा घालणाऱ्या कंपन्यांमध्ये काही लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, उद्योजक, व्यावसायिकांप्रमाणेच सर्वसामान्यांचाही पैसा अडकला आहे. तरीही लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांशी करार केलेला नाही. त्यांचे डिमॅट खातेही उघडलेले नाही. या कंपन्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात मनसेचे संदीप टेंगले यांच्यासह गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

Previous Post

पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घेतला मिरासाहेब दर्ग्याचा आशीर्वाद. म्हणाले, मला…!

Next Post

दिवाळीच्या तोंडावर हद्दपार : रेकॉर्डवरील दोन आरोपींना पोलिसांचा दणका; तीन जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश .

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दिवाळीच्या तोंडावर हद्दपार : रेकॉर्डवरील दोन आरोपींना पोलिसांचा दणका; तीन जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश .

दिवाळीच्या तोंडावर हद्दपार : रेकॉर्डवरील दोन आरोपींना पोलिसांचा दणका; तीन जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश .

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group