• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ” : पोलीस निरीक्षक संजीव झाडे

पोलीस खात्याचा अभिमान असणारा कर्तव्यदक्ष अधिकारी

Admin by Admin
December 4, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, विशेष, शैक्षणिक, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ” : पोलीस निरीक्षक संजीव झाडे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

✒️मुख्य संपादक : संकेतराज बने ७४१०५००५४२ (मुख्यमंत्री वृत्तपत्र / गोपनीय खबऱ्या)

आयुष्याच्या रंगमंचावर विधात्याने दिलेली वेगळी भूमिका साकारताना अंगावर पडलेली जबाबदारी, वाहून घ्यावे लागणारे कठोर निर्णय, कर्तव्य पूर्तीची अपरिहार्यता असते .तरीही एका बाजूला कर्तव्याला न्याय देत असताना, ज्या समाजाने घडवले, शिरावर असलेली जबाबदारी पार पाडण्या इतपत समर्थ बनवले , त्या समाजाप्रती आपण देणे लागतो . हा भाव कायम मनात जागृत ठेवणारे अनेक चेहरे पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस खात्याचा अभिमान असलेल्या या चेहऱ्यांमध्ये नुकतेच मिरच शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संजीव झाडे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

🛑 महाराष्ट्राच्या स्वाभिमानी माती मधल्या नांदेडच्या बिलोली या छोट्याशा गावी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले संजीव झाडे यांनी खरे तर महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या कार्याचा आगळावेगळा ठसा जनसामान्यांच्या मनात उमटविला आहे. गोरगरिबांची कामे तातडीने निस्वार्थी भावनेने मार्गी लावण्यात व त्यांना न्याय देण्यात या कर्तव्य कठोर नांदेडच्या भूमिपुत्राचा मोठा हातखंडा आहे.

प्राथमिक शाळेत शिक्षण पूर्ण करीत असतानाच उच्चपदस्थ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दैनंदिन जीवनात आयुष्याला कलाटणी देण्यासाठी काही नियम अंगी बाळगले.आयुष्यातील संघर्षाचा प्रवास जाणून घेताना बरेच चांगले वाईट अनुभव आले आणि त्यातूनच होरपळून निघाल्यावर एक लढवय्या व्यक्तिमत्व तयार झाले.

पोलीस दलाचा अभिमान असल्याने महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्य बजावण्याची संधीच ते शोधत होते. या अगोदर ते विद्यार्थी घडवण्यात मग्न होते म्हणजेच शिक्षकी पेशामध्ये ते कार्यरत होते. 2005 साली संजीव झाडे यांनी पोलीस दलात प्रवेश केला.

कित्येक किचकट गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश मिळाले .पण पोलीस म्हटले तर आईने त्यागलेला कर्ण अशीच भावना सर्वसामान्यांची होते.सामान्य जनतेबरोबरच अधिकारी व कर्मचारी यांना आपला असा वाटणारा हा खमक्या अधिकारी अपसुकच मनाला भावून जातो.

पोलीस खात्यात नोकरी करता करता मन अगदी निष्ठूर बनते. ही समाज प्रतिक्रिया अंगवळणी पडते म्हणा किंवा कर्तव्य पूर्तीसाठी कठोरता अंगी बाणावी लागणे या अपरिहारतेमुळे म्हणा, खाकीतला माणूस नेहमीच दया माया नसलेला निष्ठूर म्हणून बदनाम होत राहिला आहे.अर्थात या बदनामी पलीकडे खाकीच्या आत असलेल्या हाडामांसाचा गोळा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाप्रमाणेच असतो. त्याला सामान्य माणसाला असते तसेच जिवंत मन असते, भावना असतात.

पोलीस खात्यात काम करणारा अधिकारी असो, नाहीतर कर्मचारी धड बोलत नाही. त्यांना अदबीने बोलताच येत नाही. फिर्याद, जबाब, आरोपपत्र लिहिण्या पलीकडे पेन – कागदाची त्यांचा संबंध नाही. त्यांना लिहिताच येत नाही असा एक समज समाज मनावर खोलवर रुतला आहे.एखादं दुसरा अपवाद असू शकतो, पण एक जात वर्दीवाले एवढे निष्ठूर निरस असतात हा खोडसाळ समज अनेक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी वारंवार कृतीने खोडून काढला आहे. पोलीस निरीक्षक संजीव झाडे हे त्यातलेच एक व्यक्तिमत्व.

पोलीस खात्यात काम करताना मन कठोर होतेच नव्हे तर ते कठोर करावेच लागते.कल्पनेपलीकडचे सत्य शोधून काढण्याची बाणलेली सवय कळत – नकळत वर्दीच्या आत असलेल्या माणसाचे हृदय आणि मेंदू या दोन्ही यंत्रणांना चालना देते.आणि खेळता खेळता चिमुकल्यांच्या हातून किल्ल्यांची सुंदर प्रतिकृती तयार व्हावी इतक्या अलगदपणे साहित्याची निर्मिती होते. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा प्रवास याच वाटेवर सुरू आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मुख्यमंत्री परिवार व गोपनीय खबऱ्या महामीडिया यांचेकडून भरभरून शुभेच्छा.

Previous Post

मिरजेत भर पावसात पेटत्या मोटारीचा थरार…

Next Post

कडेगाव महसूलला स्वच्छतेची गरज…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगाव महसूलला स्वच्छतेची गरज…

कडेगाव महसूलला स्वच्छतेची गरज...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group