• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील शासकीय दूध डेअरी अखेर भंगारात : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनताही अंधारात…!

Admin by Admin
October 11, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
स्वराज्य योध्दा प्रतिष्ठानच्या मनोज महाडीक यांनी पंचायत समिती लढवावी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /कित्येक दिवसांपासून रखडलेला शासकीय दूध डेअरीचा प्रश्न आणि कित्येक वर्षांपासून रखडलेला मिरजेतील रस्त्यांचा प्रश्न हा लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्तृत्वाचा आरसा आहे. सहकारी आणि सरकारी संस्था बंद पाडून मोक्याच्या जागांचा ‘बाजार’ करण्याचा ‘पॅटर्न’ सांगली, मिरजेला नवा नाही. तो पॅटर्न मिरज येथील शासकीय दूध डेअरीच्या ५२ एकर जागेबाबत राबवला जाईल, अशी भीती मिरजकरांना वाटू लागली आहे.

ही जमीन मिळवण्यासाठी काही संस्थांची नावे पटलावर आली आहेत, मात्र पडद्याआडची नावे मोठी आहेत. त्यांच्या घशात जागा जाता कामा नये. इथे पुन्हा डेअरी उभी करण्यास प्राधान्य द्यावे, ते होणार नसेल तर लोककल्याणकारी योजनांसाठी ही जागा वापरावी, अशा सूचना आता मिरजकरांकडून येऊ लागल्या आहेत.

‘मिरजेतील शासकीय दूध डेअरी अखेर भंगारात’ या वृत्ताने आज सांगली जिल्ह्यातील जनमानसाला वेदना झाल्या. आणखी एक लौकिकप्राप्त संस्था अस्ताला जात असल्याबाबत हळहळ व्यक्त झाली. सरकारची सध्याची भूमिका पाहता डेअरी वाचवण्याची शक्यता कमी आहे. या डेअरीच्या ५२ एकर जागेचे काय, हा मुद्दा कळीचा असेल. जागा मिरजेत मध्यवर्ती ठिकाणी आहे.

मिरज रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठ, नियोजित पेठ-सांगली राष्ट्रीय उपमहामार्ग यांपासून काही मिनिटांच्या अंतरावरील आहे. ‘गुगल अर्थ’वरून मिळालेले छायाचित्र पाहिले तर ही जागा म्हणजे मिरजेतील ‘आरे’ आहे. प्रचंड वनराई, दाट झाडी आहे. सरकारकडे ती मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र ती खासगी, सहकारी संस्था किंवा ट्रस्टला न देता ती व्यापक लोककल्याणाच्या कामासाठी वापरात आणावी, अशा सूचना येऊ लागल्या आहेत.

पालकमंत्री सुरेश भाऊंना निर्णय घेण्याची संधी

मिरजेचे आमदार सुरेश खाडे जिल्ह्यातील एकमेव कॅबिनेट मंत्री आणि आता पालकमंत्री आहेत. त्यांच्याच मतदार संघातील हा प्रश्‍न आहे. त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेऊन ही जागा योग्य त्या कामासाठी उपयोगात आणण्याची संधी आहे.

Previous Post

लाचखोर महिला तलाठी मनीषा कुलकर्णी अखेर लाचलुचपतच्या सापळ्यात

Next Post

सांगली : घनकचर्‍यासाठी फेरनिविदा; वादग्रस्त ठराव होणार रद्द

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : घनकचर्‍यासाठी फेरनिविदा; वादग्रस्त ठराव होणार रद्द

सांगली : घनकचर्‍यासाठी फेरनिविदा; वादग्रस्त ठराव होणार रद्द

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group