Sunday, June 8, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक, चुलतीवर पुतण्याने केला तोंड दाबून बलात्कार..!

Admin by Admin
March 26, 2022
in क्राईम
0
धक्कादायक, चुलतीवर पुतण्याने केला तोंड दाबून बलात्कार..!

नाते संबंधांना काळीमा फासण्याचे प्रकार केव्हाच घडलेत. मात्र, आता कुटुंबात साधी माणुसकीही उरली नसल्याचे समोर येत आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथे एका 28 वर्षीय विवाहित चुलतीवर चक्क पुतण्याने बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेने घोटी पोलीस (Police) ठाण्यात पुतण्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयित पुतण्या अवघ्या 22 वर्षांचा असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किरण वसंत दिवटे असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. फिर्यादीमध्ये नमूद अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या पुऱ्या करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला खोटे कारण सांगून संशयित पुतण्याने बाहेर नेले आणि बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली आहे.

नेमके प्रकरण काय?

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या पुऱ्या करण्यासाठी गेली होती. ही संधी साधून गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास किरण वसंत दिवटे हा पुतण्या (रा. शेणवड बुद्रुक, ता. इगतपुरी) घराबाहेर गेलेल्या पीडित चुलतीकडे गेला. पीडित चुलतीला त्याने सांगितले की, नाना (पीडित महिलेचे पती) दारू पिऊन पडले आहेत. चल तुला दाखवतो म्हणून सोबत यायला लावले. महिलेने पुतण्यावर विश्वास ठेवला. मात्र, इथेच ती जाळ्यात अडकली.

तोंड दाबून बलात्कार

पुतण्याने आपल्या काकूला एका नाल्यासारख्या खड्डयाजवळ नेले. तिथे मारहाण करून तोंड दाबले. यावेळी तिच्यावर बलात्कार केला. कोणाला सांगितले, तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित महिलेने पतीला सर्व घटना सांगितल्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात हजर होऊन महिलेने याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी पुतण्या किरण वसंत दिवटे याला पोलिसांनी अटक केली आहे .

गुन्हा केला कबूल

संशयित पुतण्याने पोलीस चौकशीत गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेचे कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केदारे, गायकवाड आदींनी कसून तपास सुरू केला आहे.

Previous Post

मिरजेत पोलिसांवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.

Next Post

पदोन्नती झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांचा उद्या सांगलीत सत्कार व मेळावा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पदोन्नती झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांचा उद्या सांगलीत सत्कार व मेळावा

पदोन्नती झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांचा उद्या सांगलीत सत्कार व मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014