• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत पोलिसांवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.

Admin by Admin
March 26, 2022
in क्राईम
1 min read
0
मिरजेत पोलिसांवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / शहरातील हाडको कॉलनी येथे जबरी चोरी करणार्‍या गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

जबरी चोरी प्रकरणात इरफान विजापुरे, आरबाज आणि एक अल्पवयीन तर पोलिसांवर हल्ला प्रकरणी इरफान विजापुरे व एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : इरफान विजापुरे व एक अल्पवयीन तरुण हाडको कॉलनीतील प्रतिभा पाथरुट यांच्या दुकानात गेले. त्यांनी सिगारेटची मागणी केली. त्यावेळी त्यांनी सिगारेट नसल्याचे सांगितले. त्यानंतर संशयितांनी चॉकलेटची मागणी केली. त्यावेळी प्रतिभा पाथरुट यांनी पाच रुपये मागितले. यावेळी दोघांनी दुकानातील अंड्याचा ट्रे आणि चॉकलेटचा डबा रस्त्यावर फेकून दिला. इरफान हा रिक्षातून कोयता घेवून येवून दुकानातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी कापून टाकण्याची धमकी दिली.

या घटनेची माहिती मिळताच हवालदार सचिन कुंभार व चंद्रकांत गायकवड घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी इरफान विजापुरे व अल्पवयीन मुलाने पोलिसांना “तुम्ही आमच्या मॅटरमध्ये पडू नका, मला ओळखत नाही का?” असे म्हणून इरफान हा हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत गायकवाड यांच्या अंगावर कोयता घेवून धावून गेला. ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक कचरे पथकासह घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत देखील झटापट करून संशयितांनी शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत जबरी चोरी प्रकरणी तिघांविरुद्ध व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

” दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा व न्यायिक नसून चोर बाजारातला “….

Next Post

धक्कादायक, चुलतीवर पुतण्याने केला तोंड दाबून बलात्कार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक, चुलतीवर पुतण्याने केला तोंड दाबून बलात्कार..!

धक्कादायक, चुलतीवर पुतण्याने केला तोंड दाबून बलात्कार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group