• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत 47 जणांना सव्वातीन कोटींना गंडा

Admin by Admin
July 4, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शासनाची फसवणूक; आसंगी येथील प्रकार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी : मिरजेत शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून महिन्याला 12 ते 25 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने समीर अख्तर हुसेन (वय 37, रा. तासगाव फाटा, मिरज) याने 47 जणांना 3 कोटी 36 लाख 65 हजार रुपयांना गंडा घातला आहे.

याप्रकरणी योगेश शांताराम घस्ते, राहुल वायदंडे यांच्यासह 47 जणांनी समीर हुसेन याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समीर हुसेन हा तासगाव फाटा येथे राहण्यास आहे. त्याने ड्रीम मल्टी ट्रेड सर्व्हिसेस ही शेअर मार्केटची कंपनी आहे. या कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास महिन्याला 12 ते 25 टक्के इतका परतावा मिळतो. असे नफ्याचे आमिष दाखविले होते.त्यामुळे योगेश घस्ते यांच्यासह नातेवाईक आणि काही मित्र अशा 47 जणांकडून समीर हुसेन याने तब्बल 3 कोटी 36 लाख 65 हजार रुपये इतकी रक्‍कम गुंतवून घेतली होती.

पैसे देण्यास टाळाटाळ
पैसे गुंतविल्यानंतर गुंतवणूकदारांनी समीर हुसेन याच्याकडे परतावा देण्याची मागणी केली. परंतु हुसने याने परतावा देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच काही जणांनी गुंतविलेले पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु त्याला देखील हुसेन टाळाटाळ सुरू केली होती. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागण्यासाठी हुसेन याला वारंवार फोन केला असता फोन उचलत नव्हता. त्यामुळे काही जणांनी घरी जाऊन पाहणी केली. तो घरी देखील सध्या वास्तव्यास नसल्याचे आढळून आले. त्यामुळे शेअरमार्केटच्या माध्यमातून महिन्याला 12 ते 25 टक्के इतका परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच पैसे न देता पसार झाल्याने 47 जणांनी त्याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

खंडेराजुरीच्या हायस्कुलसाठी ब्रम्हनाथ यात्रा कमिटी कडून २५ हजारांची मदत…

Next Post

सांगली : मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची झाली गोची..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची झाली गोची..!

सांगली : मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची झाली गोची..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group