• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | २-३ दिवसांत भाजपचं सरकार येणार ? या केंद्रीय मंत्र्याने केलं सूचक विधान..!

Admin by Admin
June 26, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | २-३ दिवसांत भाजपचं सरकार येणार ? या केंद्रीय मंत्र्याने केलं सूचक विधान..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या महा मिडीया : जालना : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. यादरम्यान या सत्तानाट्यात भाजपने उडी घेतली आहे, भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोरच येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा केला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दानवे उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही जिल्ह्यात आमदार खासदारांना त्यांचा मान द्या, राज्यात गोंधळ सुरू आहे म्हणून हे म्हणत नाही, आमचं उद्घाटनाच्या पत्रिकेत नावं नसतं, अधिकार्‍यांना प्रोटोकॉल लक्षात येत नाही? सकाळी फोन करून सांगतात, ही चांगली पध्दत नाही. सरकार येतील सरकार जातील, आम्ही विरोधी पक्षात असलेलं चांगलं आहे, असं बोलता येतं. दोन तीन दिवसात हेही बंद होणार आहे, टोपे साहेब लक्ष ठेवा. असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. तसेच दोन तीन दिवसात भाजपचं सरकार राज्यात येणार का असा प्रश्न विचारला जातोय.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने याच्याशी आमचा संबंध नसल्याचे सांगत ही शिवसेनेतील अंतर्गत गोष्ट असल्याचे म्हटले होते, तसेच वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. दरम्यान रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा भाजपने या राजकारणात उडी घेतल्याचे दिसत आहे. नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येणार का, याबाबत सूचक विधान केलं आहे.

Previous Post

एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या सुनावणी होण्याची शक्यता

Next Post

मालगावमधील सामाजिक कार्यकर्त्याचा अपघातादरम्यान मृत्यू…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…

मालगावमधील सामाजिक कार्यकर्त्याचा अपघातादरम्यान मृत्यू...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group