• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘ताई’चा खून करून टाकले येरळा तीरी..! चाणाक्षपणे छडा लावणाऱ्या कडेगाव पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी..!!

कुजलेला मृतदेह सापडला, शिताफीने तपास करून खुनाचा उलगडा केला

Admin by Admin
June 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
‘ताई’चा खून करून टाकले येरळा तीरी..! चाणाक्षपणे छडा लावणाऱ्या कडेगाव पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी..!!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव:- खबऱ्या प्रतिनिधी

कडेगाव तालुक्यातील येरळा नदीत नेवरी हद्दीमध्ये पोलिसांना एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहाचे शवविच्छेदन सुद्धा करण्याची परिस्थिती नव्हती ओळख पटवणे तर लांबच ,मात्र यातही कडेगाव पोलिसांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडवत अवघ्या आठ दिवसात मृतदेहाच्या अंगावरील कपडे व अलंकारांवरून शिताफीने तपास करत मयत महिलेच्या खुनाचा उलगडा केला आहे. जिथं मयताची ओळख पटवणे मुश्कील होते तिथं कडेगाव पोलिसांनी ओळख पटवून महिलेच्या खुनाचा उलगडा करून संशयितास ताब्यात ही घेतले यावरून कडेगाव पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यामध्ये घटनास्थळ, विविध ठिकाणे आणि खबऱ्याला मिळालेली माहिती अशी की, ६ जुन २०२२ रोजी येरळा नदीपात्रात नेवरी हद्दीमध्ये पुलाच्या जवळ एक मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. कडेगाव पोलीस ठाण्याचे हवालदार उदयसिंह देशमुख, चंद्रकांत कारंडे आणि जोतिराम पवार यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह तपासणी केली असता सदर मृतदेह महिलेचा असल्याचे लक्षात आलं. मृतदेह अगदी कुजलेला असल्याने त्याचं शवविच्छेदन करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पात्राशेजारी त्याचा अंत्यविधी करण्यात आला मात्र यापूर्वी देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे व अलंकार यांचं निरीक्षण करून घेतले होते. जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे आणि त्यांच्या टीमने तपास यंत्रणेचा वेग वाढवला.

कडेगाव, विटा, कराड, मसूर, म्हासुरने, चोराडे तसेच आसपासच्या भागात बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आता सुतावरून स्वर्ग गाठण्याचे अवघड लक्ष कडेगाव पोलिसांनी स्वीकारले होते. याबरोबरच मृत महिलेच्या अंगावरील कपडे आणि अलंकार यावरून ही तपास सुरू होता. अलंकारांवरील काही खुणा आणि कपडे यावरून विटा पोलीस ठाण्यातील एका बेपत्ता महिलेचं वर्णन मयताशी जुळू लागले. पोलीस निरीक्षक भोपळे आणि त्यांच्या टीमने आपला मोर्चा तिकडं वळवला आणि तपास वेग आणखी वाढवला. आता पोलिसांना कुठंतरी आशेचा किरण दिसून येत होता. बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांना बोलवून मृतदेहावरील अलंकार आणि कपडे दाखवले असता ओळख पटली. सदर महिला ताई सचिन निकम वय ३२ सध्या रा विटा सुतारकी मूळ पत्ता बलवडी ता खानापूर येथील असल्याचं स्पष्ट झालं. सदर महिला ५ मे २०२२ पासून घरातून बेपत्ता होती व तिच्या कुटुंबियांनी विटा पोलिसात याबाबत ७ मे रोजी फिर्याद दिली होती.

आता कडेगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे आणि त्यांच्या टीमने आपलं संपूर्ण लक्ष या बेपत्ता महिलेकडे वळवले आणि तपास सुरू केला असता तिचा राहुल सर्जेराव पवार वय ३१ सावकारनगर विटा मूळ गाव वासुंबे ता खानापूर याचेशी जास्त संपर्क असल्याचे समोर आले. त्यानंतर भोपळे यांच्या टीमने त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने ताई हीचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचे समोर आले.

अवघ्या आठ दिवसात निव्वळ कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेह आणि तापसास कोणतीच दिशा नसताना मृतदेहावरील कपडे आणि अलंकारांवरून कडेगाव पोलीसांनी केलेला उत्कृष्ट तपास प्रशंसेस पात्र असून त्यांचं तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या टीम मध्ये हवालदार उदय देशमुख, चंद्रकांत कारंडे, जोतिराम पवार, हरी पवार, संपत जाधव, शिवाजी माळी, नवनाथ रावताळे ,पंकज माने यांनी सहभाग नोंदवला आणि आपली उत्कर्ष कामगिरी बजावली.

Previous Post

मिरज | ‘वॉन्लेस’ रूग्णालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मदतीसाठी पुढाकार, इंग्लंडमध्ये क्रिकेट सामना..

Next Post

बाप रे..! सांगली जिल्ह्यात ‘एवढे’ महिला -पुरुष बेपत्ता! शोध थांबला…?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बाप रे..! सांगली जिल्ह्यात ‘एवढे’ महिला -पुरुष बेपत्ता! शोध थांबला…?

बाप रे..! सांगली जिल्ह्यात 'एवढे' महिला -पुरुष बेपत्ता! शोध थांबला...?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group