• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजपचे आमदार नितेश राणे त्यांच्या हत्येचा कट रचला गेला होता , खळबळजनक आरोप.

नितेश राणे यांचा दावा ; ‘तो’ कट रचला गेला होता

Admin by Admin
March 25, 2022
in क्राईम, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
सावधान..! या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला रेड अलर्ट
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करावी लागेल असं सांगितलं होत.

परंतु तेथील कर्मचारी आला आणि त्याने मला सांगितलं की, साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे.

या कर्मचाऱ्याने मला कल्पना दिल्याने मी बालंबाल बचावलो आहे. त्यामुळेच आज मी जिवंत राहिलो, असा दावा नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केला आहे. नितेश राणे पुढे म्हणाले की, या राज्यात गुन्हे वाढत आहेत.

पण राज्य सरकारकडून त्या संबंधी खोटी माहिती दिली जात आहे. फार मोठ्या मोठ्या गोष्टीत या लोकांना लक्ष घालायचे आहे, यांना फार मोठी काम करायची आहेत.

विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करायचे आहेत. पालिकेला तर काहीच काम राहिले नाही. पालिकेच्या आयुक्ताला फक्त आता लोकांच्या घराची मेजरमेन्टची काम रहिले आहेत असा घाणाघातही त्यांनी केला.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.परंतु त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर नितेश राणे यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र, त्यावेळी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी अजून एक गौप्यस्फोट केला आहे.

ते म्हणाले की, माझ्याकडे पेन डाईव्ह आहे तो मी न्यायालयात देणार आहे. ८ तारखेच्या रात्री राज्यातला एक मंत्री त्या पार्टीत होता. त्याचे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात देऊ, असं नितेश राणे म्हणाले.

Previous Post

बार्शीच्या पोलीस निरीक्षका विरोधात मी स्वतः हजारोंचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होईल का..?

Next Post

गडकरी साहेब, तासगाव, आरवडेजवळील रस्त्यावरून गाडी चालवून दाखवा आणि हाडे खिळखिळी करून घ्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गडकरी साहेब, तासगाव, आरवडेजवळील रस्त्यावरून गाडी चालवून दाखवा आणि हाडे खिळखिळी करून घ्या

गडकरी साहेब, तासगाव, आरवडेजवळील रस्त्यावरून गाडी चालवून दाखवा आणि हाडे खिळखिळी करून घ्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group