• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बार्शीच्या पोलीस निरीक्षका विरोधात मी स्वतः हजारोंचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होईल का..?

Admin by Admin
March 25, 2022
in क्राईम, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
बार्शीच्या पोलीस निरीक्षका विरोधात मी स्वतः हजारोंचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होईल का..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत राज्यातील समस्यांवर मुद्दे उपस्थित केले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या छोट्या भाषणासह महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र म्हणत मविआवर जोरदार हल्लाबोल केला. बार्शीतील पोलीस निरीक्षक शेळके आणि आमदार राजेंद्र राऊत यांचा वाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशानात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदारपणे उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी अवैध व्यवसायाविरोधात मुद्दा मांडत असतील आणि तोही पुराव्यानिशी देत असतील तर त्याचा तपास होणं गरजेचे आहे. मात्र अवैध धंद्याविरोधात लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी मुद्दे मांडत आहेत म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येत असेल तर ही चुकीची गोष्ट असल्याचे सांगत पोलीस निरीक्षकाबाबत काही गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या. तर अशा गोष्टी होत असतील तर तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेण असे म्हणत त्यांनी जोरदार आणि गंभीर आरोप केले.

यामध्ये आमदार राऊत यांच्या मुलाला फसवण्याचाही प्रकार घडण्याची शक्यता त्यांनी सांगितली. तर या पोलीस निरीक्षकांबाबत मी स्वतः तक्रार करुनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणववीस यांनी गृहमंत्री यांच्यावरही टीका केली. या प्रकरणी बार्शीच्या पोलीस निरीक्षकाबद्दल गृहमंत्र्यांनी एकादा आपल्या छातीवर हात ठेऊन खरे काय ते सांगावे असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

लोकप्रतिनिधींवर पोलिसांकडून दंडूकेशाही

या सगळ्या चुकीच्या घटना घडत असून लोकप्रतिनिधींवर जर पोलिसांकडून दंडूकेशाही चालवली जात असेल तर ती चुकीची आहे, आणि त्यासाठी मी स्वतः तिथे जाऊन हजारोंच्या संख्येने मोर्चा काढेन असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मोठे आणि भयानक घोटाळे

तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मला आश्चर्य वाटतं की कोविडच्या काळातही इतके मोठे आणि भयानक घोटाळे झाले आहेत की, त्याविषयी न बोललेच बरं. तर सप्टेंबर 2020 मधील परिस्थिती अशी होती की, वजन पडल्याशिवाय कोणतीही फाईलीच हालत नव्हती. त्यामुळे या सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

फाईल पुढं का सरकत नाही

राज्यातील गरिबांसाठी औषध खरेदीसाठी आयुक्तांना पत्र पाठवण्यात आली तीही 15 महिन्यात 18 स्मरणपत्र पाठवली गेली. तर वर्षभरानंतर फाईल गहाळ झाल्याचं सांगण्यात आले, त्यानंतर मग पुन्हा वेगळं पत्र देण्याती आली तरीही फाईल ही काही पुढं सरकली नाही त्यामुळे ही फाईल नेमकी कशाटची वाट पाहत होती हे वेगळं सांगायला नको असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी कशी घोटाळे करते यावर जोरदार टीका त्यांनी केला.

मुंबईत येणाऱ्या गरीबांना आपण काय देतो?

यावेळी महापालिकेला सर्वात जास्त इंटरेस्ट कशात तर पेन्ग्विनमध्ये आहे. पेग्विनचा प्रश्न उपस्थि करुन मुंबईतील इतर विकासाच्या गोष्टीकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबईची रंगरंगोटी करणे चांगली गोष्ट आहे, पण पण मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गरीब माणसाला उपचारासाठी आपण काही देत नसू तर त्याचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Previous Post

सांगली | विवाहितेचा पैशांसाठी छळ , संशयितांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

भाजपचे आमदार नितेश राणे त्यांच्या हत्येचा कट रचला गेला होता , खळबळजनक आरोप.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सावधान..! या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

भाजपचे आमदार नितेश राणे त्यांच्या हत्येचा कट रचला गेला होता , खळबळजनक आरोप.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group