मिरज ; खबऱ्या प्रतिनिधी: मालगाव (ता. मिरज) येथे सासरच्या छळाला कंटाळून रोहिणी सुनील आवटी (वय 24) या विवाहितेनेे गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
पती सुनील सुभाष आवटी आणि सासरा सुभाष शंकर आवटी (दोघे रा. मालगाव) यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहिणी यांचे सुनील आवटीसोबत सन 2016 मध्ये विवाह झाला होता. रोहिणी यांचा माहेरून पैसे आणणे, हुंडा आणणे या कारणातून सासरकडून छळ केला जात होता. या छळाला कंटाळून रोहिणी यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पती आणि सासरा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु सासू, नणंद आणि दीर हे तिघे घटना घडल्यानंतर फरारी झाले आहेत. आत्महत्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मृतदेह स्वीकारण्यास नकार
रोहिणी यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार देत मिरज शासकीय रुग्णालयात गोंधळ घातला.

