• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीमध्ये पोलिसावर हल्ला.

Admin by Admin
June 4, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी; कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी गेलेले संजयनगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अमोल नायर यांच्यावर हल्ला करण्यात आला. सह्याद्रीनगरजवळ शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सह्याद्रीनगर येथील मोकाशी कुटुंबातील सख्ख्या भावांमध्ये कौटुंबिक विषयावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.

ही मारामारी रस्त्यावर आली. एका भावाने चाकू घेऊन प्रचंड दहशत माजविली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संजयनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. याच परिसरात हवालदार अमोल नायर गस्त घालत होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी नायर यांना घटनास्थळी पाठविले.

नायर यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघे भाऊ ‘हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. तुमचा काय संबंध’, असे म्हणून नायर यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना धक्काबुक्की केली. यात नायर किरकोळ जखमी झाले. त्यानंतर आणखी काही पोलिस बोलविण्यात आले. पोलिसांनी मोकाशी भावांना ताब्यात घेतले. नायर यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा नायर यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितले.

Previous Post

मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?

Next Post

म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांड,दोषींना शिक्षा होण्यासाठी सरकार पावले उचलणार..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांड,दोषींना शिक्षा होण्यासाठी सरकार पावले उचलणार..

म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांड,दोषींना शिक्षा होण्यासाठी सरकार पावले उचलणार..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group