• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?

माणसासाठी कायदा की कायद्यासाठी माणूस..?

Admin by Admin
June 3, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, शोध पत्रकारिता
1 min read
0
सांगलीत अपहरण करून एकास लुटले , तानंग फाट्याला नेऊन रॉडने केली मारहाण..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

झटपट श्रीमंत व्हावे, असे कोणाला वाटणार नाही ?मात्र त्या झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आपण काही चुकीचे तर करत नाही ना? त्याचा सारासार बुद्धीने विचार कोण करणार.? मात्र सद्यस्थितीत जर रिस्क घेवून गैरकायदेशीर प्रकरणाशी निगडीत असलेल्या ‘त्या’ व्यापाऱ्याला जिगरबाज आणि धाडसी निर्णय घेणारे खाकीतील खमक्या अधिकारी सोडतीलच कसे ? जरी त्याने पैशांची लालच दाखवली तरी, इमानदार अधिकारी अशा बेकायदा अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालणारच कसा..?

कलीयुग आले आहे आणि खऱ्याची माय वनवासाला जाणार आहे, याचा प्रत्यय आता येवू लागला आहे. मिरज तालुक्यातील वड्डी येथील ‘पटेल ग्रुफ अँड कंपनी’च्या फार्महाऊसवर केंद्रीय सीमा शुल्क विभागाने छापा टाकला अन् त्यात सापडला म्हणे ‘कवळा‘ मारून नेण्याइतपत ‘गांजा..? वाचकहो हे तुम्हाला तरी पटतयं का? धाड पडली आणि ज्याचे फार्महाऊस आहे तो म्हणे आजपर्यंत सापडलाच नाही. किरकोळ माहीतीच्या आधारे हे सीमा शुल्क विभागाचे अधिकारी (‘बेफना’) आलेच कसे ? यांना अधिकृत आणि पुराव्यानिशी मोठी माहिती मिळाल्यानंतरच यांनी स्वतःच्या कार्यालयाचा तळ सोडला असेल ना? की छापा टाकून कारवाई केली म्हणून नुसतीच बोंब मारली आहे.? या प्रकरणातील मुख्य आरोपी हा कुठे फरार आहे याची माहितीसुद्धा काही जणांना असेल असे सर्व मिरजकारांच्यातून बोलले जात आहे. “लोकांचे मत” मांडणाऱ्या एका दैनिकाने याच बडेशाही मारणाऱ्या तस्कराची बातमी आज प्रसिद्ध केली आहे.

प्रशासनाच्या नजरेतून “जिरेनियम ऑइल चुकले कसे? ज्यावेळी छापा पडला तेव्हा घटनास्थळी तब्बल दीड कोटींचे जिरेनियम ऑईल होते म्हणे? मग केंद्रीय सीमा शुल्क विभाग अन् गृह विभागाच्या बारकाईने बघणाऱ्या नजरांना सुद्धा’ सीमा” आली होती का?आता मात्र हद्द झाली.गांजा, अफू ,चरस, कोकेन यापेक्षाही जास्त नशा पैशांत असल्याचे प्रशासनाच्या “मेहरबानी” कारवाईतून दिसून आल्याची चर्चा नागरिकांत आहे.

सावकारीच्या गुन्हयांत
पित्रा- पित्रांना मोक्का लागेल का ?

‘मोक्का’ कायद्यातील २१ (३) या कलमानुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. तोपर्यंत मोक्काअंतर्गत आरोपींना जामीन मंजूर होत नाही. आरोपीविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावा सादर करता न आल्यास त्यानंतर जामीन मिळतो. परंतु बऱ्याचवेळा वर्षभरही आरोपींना जामीन मंजूर होत नाही.

 

 

जिल्हा पोलिस प्रमुख गेडाम साहेबांचा वचक, धाक- दरारा आणि आदरयुक्त दहशत त्यांनी कार्यभार स्विकारला तेव्हापासूनच आहे. बेकायदा सावकारी प्रकरणी कोणाचीच भीड-भाड न ठेवता थेट मोक्का अंतर्गत कारवाईची ‘ऍक्शन‘ गेडाम साहेबांनी घेतलीय. गुन्हेगारीवर वचक ठेवून जिल्ह्यांतील गुन्हेगारीचा वाढता आलेख कमी करण्यात पोलिस यंत्रणा अयशस्वी ठरल्याची सर्वत्र चर्चा आहे.’ खबऱ्याने‘ लावलेली “एस.पी.गेडाम इन ऍक्शन” ही बातमी पाहून तरी गुन्हेगारीवर पायबंद घालावेत हीच जनतेची अपेक्षा आहे.

सांगलीकरांना एकदम अंतःकरणातून विश्वास वाटतो की,आता एस.पी गेडाम साहेब मिरजेतील सावकारी,अंमली पदार्थाच्या रॅकेटमधील हुकमी एक्का असणाऱ्या, फरारी असणाऱ्या ‘व्यापाऱ्यावर‘ मोक्का लावून मोठी कारवाई करतील हीच सांगली जिल्हयातील गुन्हयांना रोखण्यासाठी वापरलेली उपाययोजना आणि जनतेच्या नजरेत उत्कृष्ठ कामगिरीसाठी पोलिसांना मिळालेली संधी आहे.

संपूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ठ यंत्रणा -महाराष्ट्र पोलिस..!

देशातील मुंबई, पुणे,नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि उपनगरे असलेल्या शहरांत ‘मपो‘ नंबर १ला आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात कित्येक मंत्री महोदय या ‘स्वाभीमानी राज्याचे आहेत. जिथं पोलीस
यंत्रणा एवढी सक्षम आहे की, दूध का दूध – पाणी का पाणी काही वेळातच करते. मग देशातील नावाजलेली महाराष्ट्र पोलीस दलाची यंत्रणा राज्यातील एका जिल्ह्यात गुन्हयांचा आलेख वाढताना तस्कर आणि छाप्यातील मुख्य सुत्रधार डोळ्यांसमोर असताना का गप्प बसतेय.?हे त्या’ व्यापाऱ्याला आणि कारवाईसाठी गेलेल्या किंवा तपास ज्यांच्याकडे आहे अशा कर्तबगार अधिकाऱ्यांनाच माहिती असणार.?

भोळ्या भाबड्या जनतेला याचे काहीच सोयरसुतक नाही.परंतु, जनतेला जे दिसतंय ,लाखोंच्या नजरेने जे पाहिलं जातंय ते केवळ एकट्या व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून नाकारून कसं चालेल? असो, पाहुयात यापुढेही ‘यंत्रणा‘ अजून कशी फिरते आणि फिरवली जाते..?

Previous Post

“रक्तानं पत्र लिहिणारा कट्टर काळजाचा तुकडा ; सांगलीत नेत्याच्या विधान परिषद उमेदवारीसाठी फडणवीसांना पाठवले पत्र : राज्यात चर्चेचा विषय..”

Next Post

सांगलीमध्ये पोलिसावर हल्ला.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?

सांगलीमध्ये पोलिसावर हल्ला.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group