• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दोन कोटी नोकऱ्या देणार होता, त्याचं काय झालं..?

Admin by Admin
May 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
दोन कोटी नोकऱ्या देणार होता, त्याचं काय झालं..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : खबऱ्या प्रतिनिधी ; २०१४ पर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा यावर चर्चा होत होती. आता टोपी, लाऊडस्पीकर, अजाण यावर चर्चा होते. लोकांच्या प्रश्नांवर विचार नाही. दोन कोटी नोकऱ्या देणार होता.

त्याचं काय झालं, असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नरेंद्र मोदी सरकारला केला. आज शनिवारी (ता.२८) कोल्हापूर येथे पक्षाची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. महागाई दीडशे पटीने वाढली. हिंमत असेल तर चीनकडे जा ना. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पेट्रोलचा आकडा काय आहे.? १११ रुपये लिटर आहे. महाराष्ट्र, देशामध्ये आम्ही बोलत असतो. प्रश्न विचारत असतो. मग ईडी पाठवतात, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला.

दापोलीचे रिसाॅर्ट चालूच झाले नाही. त्याचे पाणी समुद्रात जाते म्हणून कारवाई केली जाते? तुम्ही आर्थिक गुन्हे शोधणारे, सांडपाणीवरुन कारवाई करता असा प्रश्न राऊत यांनी अनिल परब यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर विचारला. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य चालू द्यायचे नाही. संजय पवार दिल्लीला चालले आहेत. जरा हळूहळू बोलण्याची सवय संजय पवारांनी लावून घ्यावी, असा सल्ला त्यांनी पवारांना दिला. आता सहाव्या जागेचा वाद सुरु झाला. देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने बदनामी सुरु केली होती. ती शाहू छत्रपतींनी हाणून पाडली आहे, या शब्दात राऊत यांनी संभाजीराजे यांच्या आडून भाजप करत असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी संभाजीराजे यांचा गैरवापर केला. महाराष्ट्रावरच संकट दिल्लीच्या माध्यमातून येत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Previous Post

“तुमची ‘चंपाबाई ‘ आता इथं येत नाही असं कळलं..!”

Next Post

“गडकरी पंतप्रधान असते तर ;” ठाकरे सरकारमधील नेत्याचे मोठं विधान, चर्चांना उधाण..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“गडकरी पंतप्रधान असते तर ;” ठाकरे सरकारमधील नेत्याचे मोठं विधान, चर्चांना उधाण..!

"गडकरी पंतप्रधान असते तर ;" ठाकरे सरकारमधील नेत्याचे मोठं विधान, चर्चांना उधाण..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group