• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळ |सांगली जिल्ह्यात धक्कादायक चोरी ; मध्यरात्री फायरिंग करत….

Admin by Admin
May 21, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खळबळ |सांगली जिल्ह्यात धक्कादायक चोरी ; मध्यरात्री फायरिंग करत….
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मध्यरात्री फायरिंग करत चोरट्यानी शिरढोण येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिनच बोलेरो गाडीतून उचलून नेले. भर वस्तीत असणाऱ्या एटीएम वर चोरट्याचा धाडसी दरोडा टाकल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात एकच खळबळ उडाली. आज, शनिवारी मध्यरात्री २ च्या दरम्यान हा दरोडा टाकल्याची माहिती आहे.

याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी, कवठेमहांकाळ तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या शिरढोण गावात चोरट्यांनी भर वस्तीत धाडसी दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी फायरिंग करत एटीएम मशीनच उचलून नेले. दरोडा टाकत असताना दुसऱ्या मजल्यावरील घरमालक अर्जुन विठ्ठल निकम जागे झाले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने दगड टाकला. परंतु या चोरट्यानी त्यांच्या दिशेने फायरिंग केले.

घरमालक निकम यांनी भीतीने दार लावून घेतले. ही गोळी दुसऱ्या दिशेने गेल्याने ते बचावले. तेवढ्यात या चोरट्यानी आपले काम फत्ते करत पलायन केले. या मशीन मध्ये पन्नास लाख मशीन मध्ये असल्याची चर्चा आहे. निकम यांनी या घटनेची माहिती तातडीने कवठेमहांकाळ पोलीस यांना रात्रीच दिली.

चोरट्यांनी दुसरे मशिनही नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे घटनास्थळावरुन दिसून आले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षितकुमार गेडाम, जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले ,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबल यांनी आज तातडीने भेट दिली. आणि पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले, परंतु ते थोड्या अंतरावर जाऊन तिथेच घुटमळत होते. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.

Previous Post

आरगमध्ये पेटलेला पाण्याचा वणवा अखेर पावसामुळे विझला..

Next Post

‘आधी शिवबंधन बांधा, मगच उमेदवारी देण्याबाबत विचार करू’.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘आधी शिवबंधन बांधा, मगच उमेदवारी देण्याबाबत विचार करू’.!

‘आधी शिवबंधन बांधा, मगच उमेदवारी देण्याबाबत विचार करू’.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group