• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरीत मुसळधार , जत पूर्व भागाचा संपर्क तुटला…

Admin by Admin
May 20, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरीत मुसळधार , जत पूर्व भागाचा संपर्क तुटला…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; सातारा , सांगली, रत्नागिरीसह साेलापूर जिल्ह्यात वादळी वा-यासह गुरुवारी रात्री पाऊस झाला.

आज (शुक्रवार) सकाळपासून या जिल्ह्यांत पावसाच्या सरी काेसळत आहेत. दरम्यान गुरुवारी झालेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने साेलापूर तसेच सातारा जिल्ह्यात आज वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सांगली जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळ पासून पावसाने हजेरी लावली. विशेषत: जत या दुष्काळी भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे.

सोलापूर शहरात गुरुवारी दुपारपासून मुसळधार पाऊस झाला. गत चोवीस तासात सोलापुरात ३६.१ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील विजापूर रोड येथील नेहरू नगर शासकीय मैदानाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान पंढरपूरात आजही पहाटे पासून पावसाची संततधार सुरु हाेती. येथे गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Previous Post

गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी धडपड..! महिला पोलिस निरीक्षक “अँटिकरप्शन” च्या जाळ्यात..!

Next Post

मिरज | फडणवीस , दानवेंचा दौरा रद्द ; विकासकामांचे उदघाटन होणार : सभेच्या कार्यक्रमात मात्र पावसाचा “खो”..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

मिरज | फडणवीस , दानवेंचा दौरा रद्द ; विकासकामांचे उदघाटन होणार : सभेच्या कार्यक्रमात मात्र पावसाचा "खो"..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group