• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग | साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई : वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड..!

Admin by Admin
July 2, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बिग ब्रेकिंग | साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई : वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा तब्बल ₹30 लाख 60 हजार 520 किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे (वय 60) व प्रतिक दिलीप काळे (वय 34, दोघे रा. विठ्ठलनगर, वडूज जि. सातारा ) यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे १ जुलैच्या रात्री पेडगाव रोड ते काळेमळा परिसरातील पृथ्वी प्लॅनेट गृहप्रकल्पाशेजारील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान १,९८९ गोण्यांमध्ये सुमारे ९९,४५० किलो बनावट दाणेदार खत आढळून आले. या साठ्याची किंमत ₹26.85 लाख इतकी आहे.

कारवाईत नामांकित कंपन्यांच्या DAP व 10:26:26 खतांच्या बनावट छपाईच्या रिकाम्या गोण्या, लेबल्स, तसेच क्लोरोपायरीफॉस, झिंक फॉस्फाइड व बोरिक ॲसिड या बनावट कीटकनाशकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय गोण्या शिवण्याचे मशीन व पाऊच फिलिंग मशीनही हस्तगत करण्यात आले.

आरोपींकडे बनावट खत व कीटकनाशके कोठून आणली आणि नामांकित कंपन्यांच्या गोण्या कोठे छापून घेतल्या, याबाबत समाधानकारक माहिती नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी अक्षय प्रताप सावंत यांच्या फिर्यादीवरून रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, कीटकनाशक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई कृषी विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथक, सातारा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा व दहिवडी विभागाच्या पोलिसांनी संयुक्तपणे केली. जप्त नमुने रासायनिक विश्लेषणासाठी कोल्हापूर व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणधीर कर्चे करत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी घनश्याम बल्लाळ; अरविंद काळे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली

Next Post

ब्रेकिंग | महसूल विभागात मोठा फेरबदल.! साताऱ्यातील २२३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | महसूल विभागात मोठा फेरबदल.! साताऱ्यातील २२३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली..!

ब्रेकिंग | महसूल विभागात मोठा फेरबदल.! साताऱ्यातील २२३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group