• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगली जिल्हा बँकेच्या भरतीला लावला ब्रेक, जयंत पाटलांना धक्का; पडळकर जिंकले!

Admin by Admin
July 2, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगली जिल्हा बँकेच्या भरतीला लावला ब्रेक, जयंत पाटलांना धक्का; पडळकर जिंकले!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणाऱ्या ४४४ उमेदवारांच्या नोकरभरती प्रकरणी मागील काही दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वाद उफाळून आला होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नोकरभरतीला स्थगिती दिली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ४४४ उमेदवारांच्या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. पण भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणाऱ्या ४४४ उमेदवारांच्या नोकरभरतीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. तसेच वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला नियमबाह्य पद्धतीने २५० कोटींचे कर्ज दिल्याचाही आरोप केला होता. तसंच  जयंत पाटील यांच्यावरही अनेक आरोप केले होते. एवढंच नाहीतर बँकेवर प्रशासकही नेमण्यात आला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

जयंत पाटील यांच्या नावाची भाजपा नेत्याला काविळ
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी भाजप आमदर गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार केला होता.  0% NPA असलेल्या बँकेवर प्रशासक आणून त्यांनाच या नोकरभरतीत हात मारायचा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नावाची या भाजपा नेत्याला काविळ झाली आहे, गोपीचंद पडळकर यांना बँकेवर प्रशासक आणून त्यांना काहीतरी चुकीचे करायचे असल्याचा पुनःरूच्चार केला. तसंचजयंत पाटील यांचा बँकेच्या कारभारात अजिबात हस्तक्षेप नसतो. उलट मार्गदर्शन असते. असे सांगून वसंतदादा पाटील कारखाना तुमच्या पोटात का खूपतोय अशी विचारणा केली. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची १००० कोटींची मालमत्ता आहे. त्या आधारे त्यांना २५० कोटींचे कर्ज दिलेले आहे. आणि ते नियमानुसारच असल्याचे मानसिंग नाईक यांनी सांगितलं होतं.

मिरज शहरातील प्रियदर्शनी हॉटेल लगत असणारा प्रशस्त गाळा भाड्याने देणे आहे.
Previous Post

गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली १ लाखांची लाच; कॉन्स्टेबल, पोलिस पाटीलला अटक

Next Post

सोलापूर ब्रेकिंग | पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरातील ‘या’ १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या, ५ पोलिस ठाण्यांना मिळाले नवे प्रभारी; कोणाची बदली कोठे? वाचा…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सोलापूर ब्रेकिंग | पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरातील ‘या’ १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या, ५ पोलिस ठाण्यांना मिळाले नवे प्रभारी; कोणाची बदली कोठे? वाचा…

सोलापूर ब्रेकिंग | पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरातील ‘या’ १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या, ५ पोलिस ठाण्यांना मिळाले नवे प्रभारी; कोणाची बदली कोठे? वाचा...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group