• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत खळबळ | लग्नासाठी धर्म परिवर्तनाच्या अटीवरून तरुणाने संपविले जीवन

Admin by Admin
June 29, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत खळबळ | लग्नासाठी धर्म परिवर्तनाच्या अटीवरून तरुणाने संपविले जीवन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलिस प्रकरण दडपत असल्याचा नातेवाईकांचा आरोप

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

तरुणीने लग्नास नकार दिल्याने नैराश्यातून खण भागातील राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. दुर्वांक प्रमोद शेवाळे असे मृताचे नाव आहे. संबंधित तरुणीने लग्नासाठी स्वतःचा धर्म स्वीकारण्याची अट घातली होती, यावरून झालेल्या वादातून आणि नैराश्यातून दुर्वांकने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सांगली शहर पोलिस या प्रकरणाचा तपास दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दुर्वांक हा पुणे येथे नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो सांगलीत आला होता. त्याच्या घराजवळ मूळची कोल्हापूरची तरुणी तिच्या आजीकडे राहण्यासाठी वरचेवर येत होती. यातूनच या दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले, मात्र संबंधित तरुणीने ‘लग्नासाठी धर्म स्वीकारावा लागेल’ अशी अट घातली होती. त्यामुळे तो काही दिवसांपासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता. गुरुवारी दुपारी याच विषयावरून फोनवर बोलत असताना त्याने घरात गळफास लावून घेतला.

​नातेवाईकांनी दुर्वांकच्या आईचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये दुर्वांक आणि संबंधित तरुणीमधील धर्म परिवर्तनाच्या अटीसंदर्भातील सर्व संभाषण (चॅटिंग) आढळून आले. नातेवाईकांनी ते पोलिसांना दाखवूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई किंवा तपास सुरू केलेला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दुर्वांकला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

Previous Post

कवठेमहांकाळ | अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

Next Post

ब्रेकिंग | प्रवाशांनी खचाखच भरलेली खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली, चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | प्रवाशांनी खचाखच भरलेली खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली, चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

ब्रेकिंग | प्रवाशांनी खचाखच भरलेली खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली, चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group