• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कवठेमहांकाळ | अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

Admin by Admin
June 28, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कवठेमहांकाळ | अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुचाकीची थांबलेल्या डंपरला धडक : तरुणी गंभीर जखमी

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कवठेमहांकाळ-नांगोळे मार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील माजी सैनिक मधुकर गणपती नरळे (वय ६४) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची भाची स्वाती खोत (१७) गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी (दि. २६) रात्री उशिरा घडला.

ADVT – मिरज शहरातील प्रियदर्शनी हॉटेल लगत असणारा प्रशस्त गाळा भाड्याने देणे आहे.

कवठेमहांकाळ-नांगोळे रस्त्यावर बसव केमिकल फॅक्टरीसमोर रस्त्याच्या कडेला एक डंपर बंद अवस्थेत उभा होता. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून मधुकर नरळे हे भाची स्वाती खोत हिला घेऊन शिवाजीनगरकडे निघाले होते. अंधारामुळे त्यांना रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरचा अंदाज आला नाही. त्यांची दुचाकी डंपरवर पाठीमागून जोरात आदळली. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मधुकर नरळे यांचे निधन झाले.

मधुकर नरळे हे पिंपळवाडी येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होते. माजी सैनिक असलेल्या नरळे यांनी निवृत्तीनंतर गावात स्वच्छता मोहीम, सामाजिक उपक्रम आणि शिस्तीसाठी नेहमीच पुढाकार घेतला होता.

Previous Post

लफडेबाज बायको झोपेत नवरा बेशुद्ध झाल्याचं म्हणाली, पण नंतर भानगड वेगळीच निघाली..!

Next Post

सांगलीत खळबळ | लग्नासाठी धर्म परिवर्तनाच्या अटीवरून तरुणाने संपविले जीवन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत खळबळ | लग्नासाठी धर्म परिवर्तनाच्या अटीवरून तरुणाने संपविले जीवन

सांगलीत खळबळ | लग्नासाठी धर्म परिवर्तनाच्या अटीवरून तरुणाने संपविले जीवन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group