• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लफडेबाज बायको झोपेत नवरा बेशुद्ध झाल्याचं म्हणाली, पण नंतर भानगड वेगळीच निघाली..!

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम
1 min read
0
लफडेबाज बायको झोपेत नवरा बेशुद्ध झाल्याचं म्हणाली, पण नंतर भानगड वेगळीच निघाली..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीत झोपेत असताना एक व्यक्ती बेशुद्ध झाला. तो शुद्धीवर येत नसल्याने त्याच्या पत्नीने नातेवाईकांना बोलावलं. त्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला रुग्णालयात आणलं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पण पोलिसांना या प्रकरणात संशय आला आणि या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, संबंधित व्यक्तीला त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवल्याचं स्पष्ट झालं. संबंधित प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलीसही चक्रावले.

पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने पतीचा आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. खून केल्यानंतर पती झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. आनंदा हणमंत सर्जे (वय २८) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी पल्लवी आनंदा सर्जे (वय २२) आणि तिचा प्रियकर दीपक आप्पासाहेब आजमाने (वय २१) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दारूडा नवरा बेशुद्ध झाल्याचं म्हणत उपचारासाठी दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद सर्जे हा दारूच्या आहारी गेला होता. दारूच्या नशेत तो पत्नीला वारंवार त्रास देत असल्याचे तपासात समोर आले आहे. २५ जून २०२६ रोजी रात्री आनंद अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगत पत्नी आणि नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांचा तपास, प्रकरणाला वेगळाच वास..?

सुरुवातीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार एलसीबीकडून समांतर तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.

आरोपी बायकोने दिली गुन्ह्याची कबुली

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आनंदचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून खून केल्याचा संशय बळावला. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आनंद झोपेत असताना त्याचे पाय ओढणीने बांधून त्यानंतर गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. या कारवाईत एलसीबी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे सांगली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

आमदार राजेश क्षीरसागर यांचा ‘टक्केवारीचा’ कथित व्हिडिओ प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई..? संभाषण काय झाले सविस्तर वाचा..!

Next Post

कवठेमहांकाळ | अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कवठेमहांकाळ | अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

कवठेमहांकाळ | अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group