• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | सीआरपीएफ जवानावर जमावाचा हल्ला, गंभीर जखमी

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

आष्टा येथील लक्ष्मीबाई नायकवडी नगरमध्ये पती-पत्नीमधील वादातून झालेल्या गैरसमजात सीआरपीएफ जवानावर अंदाजे १५ जणांच्या जमावाने हल्ला केला. ही घटना दि. २० जून रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली.

आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमित शशिकांत घस्ते (वय ३०, रा. लक्ष्मीबाई नायकवडीनगर, आष्टा) हे सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. दि. १९ जून रोजी पती-पत्नीतील घटस्फोटासंदर्भातील वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असताना दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी, दि. २० जून रोजी सकाळी सुमारे सव्वाअकराच्या सुमारास, पत्नीला मारहाण केल्याचा गैरसमज झाल्याने गोटखिंडी (ता. वाळवा) येथील अविनाश भानुदास लोंढे, राम मस्के, निखिल दाभाडे, आदित्य दाभाडे, प्रमोद लोंढे, स्नेहा घस्ते, मनीषा लोंढे तसेच इतर सात ते आठ अनोळखी व्यक्तींनी सुमित घस्ते यांच्यावर हल्ला केला.

संशयित आरोपींनी लोखंडी पाईप, चाकू, दगड, काठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले, तसेच अविनाश लोंढे याने सुमित घस्ते यांच्या बहिणीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत जखमी सुमित घस्ते यांनी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

उद्योजकाला ३० लाख रुपयांचा गंडा, मिरजेतील ‘मॅनेजर’वर गुन्हा दाखल..!

Next Post

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ : मारहाण आणि शिवीगाळ;

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ : मारहाण आणि शिवीगाळ;

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group