• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उद्योजकाला ३० लाख रुपयांचा गंडा, मिरजेतील ‘मॅनेजर’वर गुन्हा दाखल..!

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीतील नामांकित व्यावसायिकाची कंपनीतीलच व्यवस्थापकाने तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सचिन शशिकांत मालू (रा. महात्मा गांधी रस्ता, जयसिंगपूर, ता. शिरोळ, सध्या रा. आनंद चिंतामणी सोसायटी, फ्लॅट क्र. ४०१, ओंकार बिल्डिंग, धामणी रस्ता, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. याप्रकरणी महंमद हसन रफिक पिरजादे (वय ३२, रा. न्यू रेल्वे पोलिस लाईन, स्टेशन रस्ता, मिरज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समृद्धी बिल्डिंग सिस्टीम कंपनीत फिर्यादी सचिन मालू हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दि. १६ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास संशयित महंमद पिरजादे यांच्याकडे कंपनीच्या व्यवहाराचे ३० लाख रुपये बॅँकेत भरण्यासाठी दिले होते; मात्र पिरजादे यांनी या रकमेचा बँकेत भरणा करण्याऐवजी परस्पर ती रक्कम स्वत:च्या आर्थिक लाभासाठी वापरली. हा प्रकार निदर्शनास येताच सचिन मालू यांनी संशयित महंमद पिरजादे याच्यावर गुन्हा दाखल केला.

मालू यांच्या कंपनीत पिरजादे हा गेल्या सहा वर्षांपासून नोकरीस होता. प्रामाणिकपणे काम करून त्यांनी विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच त्याच्याकडे तीस लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी देण्यात आली होती; मात्र ती बँकेत न भरता पैशासह तो पसार झाला. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

सांगली पोलिस दलात फेरबदल, ३२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

सांगली | सीआरपीएफ जवानावर जमावाचा हल्ला, गंभीर जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

सांगली | सीआरपीएफ जवानावर जमावाचा हल्ला, गंभीर जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group