• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ : मारहाण आणि शिवीगाळ;

आष्टा पोलिसात पती व सासूवर गुन्हा

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

लग्नात सोफासेट आणि दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी दिली नाही, तसेच नेट कॅफे दुरुस्तीसाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत श्रुतिका तेजस पाटील (वय २१) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती तेजस धोंडिराम पाटील आणि सासू सुरेखा धोंडिराम पाटील (दोघे रा. आरवडे, ता. तासगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुतिका यांचा विवाह ३० नोव्हेंबर २०२५ रोजी तेजस पाटील याच्याशी झाला होता. विवाह झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच १० डिसेंबर २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पती व सासूने संगनमत करून श्रुतिका यांचा छळ सुरू केला. ‘तुझ्या वडिलांनी लग्नात सोफासेट आणि दोन तोळ्यांची अंगठी दिली नाही, तू मला पसंत नाहीस, तुझे वडील सेंट्रिंगचे काम करतात, त्यांची मला लाज वाटते’, असे बोलून पती तेजस याने श्रुतिका यांचा वारंवार अपमान केला.

याशिवाय, डोळ्यांच्या उपचारासाठी लागणारे पैसे आणि स्वतःच्या नेट कॅफे दुरुस्तीकरिता माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी श्रुतिका यांच्याकडे करण्यात आली. माहेरहून पैसे आणले नाहीत, या कारणावरून संशयितांनी श्रुतिका यांना वारंवार मारहाण व शिवीगाळ केली, तसेच अन्न-पाण्यावाचून उपाशी ठेवून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर श्रुतिका पाटील यांनी आष्टा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी आष्टा पोलिस संशयितांवर गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

सांगली | सीआरपीएफ जवानावर जमावाचा हल्ला, गंभीर जखमी

Next Post

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group