• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | हद्दपार असतानाही खुलेआम शहरात वावर, गुन्हेगाराकडून गांजाची तस्करी, यंत्रणेचे अपयश.?

Admin by Admin
February 4, 2026
in क्राईम
1 min read
0
मिरज | हद्दपार असतानाही खुलेआम शहरात वावर, गुन्हेगाराकडून गांजाची तस्करी, यंत्रणेचे अपयश.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शहरातील म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली. हद्दपार गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद (वय 27) आणि सोहेल लालूखान पठाण (वय 20, दोघे रा.कैकाडी गल्ली, मिरज) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख 15 हजार रुपयांचा 7 किलो 175 ग्रॅम गांजा आणि एक लाख रुपयांची दुचाकी, असा 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी पथक नियुक्त केले होते. मिरज परिसरात उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह सुशील मस्के, ऋतुराज होळकर, सुमीत सूर्यवंशी यांचे पथक गस्तीवर असताना हद्दपार गुन्हेगार हुसेन सय्यद आणि त्याचा साथीदार सोहेल पठाण हे दोघे दुचाकीवरून येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने दोघांवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.

  • हद्दपार असतानाही मिरजेत प्रवेश कसा?

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने मिरजेतील हुसेन सय्यद याला सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. परंतु हद्दपार असताना त्याने मिरजेत प्रवेश केला होता. तसेच हद्दपार असतानाही त्याने मिरजेत येऊन गांजाची तस्करी चालविली होती. हद्दपार गुन्हेगारांकडून आता शहरात येऊन गांजाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Previous Post

डोक्यात कोयता घालून दहशत..? सांगलीत पुन्हा भीतीचे वातावरण..!

Next Post

नगरसेविका स्वाती शिंदे थेट हजेरी केंद्रावर; आठच कर्मचारी कामावर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नगरसेविका स्वाती शिंदे थेट हजेरी केंद्रावर; आठच कर्मचारी कामावर..!

नगरसेविका स्वाती शिंदे थेट हजेरी केंद्रावर; आठच कर्मचारी कामावर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group