• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

डोक्यात कोयता घालून दहशत..? सांगलीत पुन्हा भीतीचे वातावरण..!

Admin by Admin
February 3, 2026
in क्राईम
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | जीपमधून २४.९० लाखांचा सुगंधी तंबाखू-पानमसाला जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली शहरातील शामरावनगर येथे तिघा सराईत गुन्हेगारांनी एकाच्या डोक्यात कोयता घालून खुनाचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या सराईत गुन्हेगारांनी दहशत माजवत हे कृत्य केल्याने खळबळ उडाली.

कोयता हल्ल्यात ओम सुरेश सावंत (वय 18, रा. शामरावनगर, सांगली) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी अभिजित मोरे, प्रशांत चौगुले, सलमान मुजावर या तिघांविरुद्ध सांगली शहर पोलिसांत खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हद्दपार गुन्हेगार प्रशांत चौगुले व अभिजित मोरे यांना रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.

जखमी ओम सुरेश सावंत हा शामरावनगरमध्ये राहण्यास आहे. तो मोलमजुरीचे काम करतो. सोमवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर पडला. शामरावनगरमधील मुख्य चौकातून तो जात असताना तिघे संशयित त्याच्याजवळ आले. ‌’तू आम्हाला ओळखत नाहीस का?‌’, ‌’आम्ही कोण आहे माहिती आहे की नाही?‌’, ‌’तुला आता सोडणार नाही,‌’ अशी धमकी दिली. घाबरलेला सावंत हा गप्प उभा राहिला. परंतु तरीही केवळ दहशत माजविण्यासाठी संशयितांनी त्यांच्याजवळील कोयता काढला आणि सावंत याच्या डोक्यात वार केला. त्यानंतर सावंत याच्या पायावरही वार करून त्यास गंभीर जखमी केले. यावेळी सावंत याने आरडाओरडा केल्याने व रक्तस्राव सुरू झाल्याने संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर सावंत याच्या कुटुंबीयांनी तातडीने ओम याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. परंतु ज्या रुग्णालयात सावंत याच्यावर उपचार सुरू होते, त्या रुग्णालयाकडून प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती.

दरम्यान, खुनीहल्ल्याची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओम सावंत याच्या तक्रारीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

जखमीला शोधण्याची पोलिसांवर आली वेळ…

खुनीहल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिस निरीक्षक सुगावकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात जखमी दाखल झाला आहे का? याची माहिती घेतली. परंतु सावंत त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल नव्हता. जखमीच सापडत नसल्याने त्यालाच शोधण्याची वेळ पोलिसांवर आली. त्यानंतर पोलिसांनी जखमी सावंत याच्या घराचा पत्ता शोधून काढला. पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकीवरून पडल्याचे त्याने सांगितले. सावंत संशयितांच्या भीतीपोटी आणि दहशतीमुळे तक्रार देण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतरच त्याने पोलिसात तक्रार दिली.

Previous Post

जयसिंगपूर | दानोळीत मगरीचा वावर.?

Next Post

मिरज | हद्दपार असतानाही खुलेआम शहरात वावर, गुन्हेगाराकडून गांजाची तस्करी, यंत्रणेचे अपयश.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | हद्दपार असतानाही खुलेआम शहरात वावर, गुन्हेगाराकडून गांजाची तस्करी, यंत्रणेचे अपयश.?

मिरज | हद्दपार असतानाही खुलेआम शहरात वावर, गुन्हेगाराकडून गांजाची तस्करी, यंत्रणेचे अपयश.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group