खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपचे उमेदवार गणेश माळी यांनी कामाच्या जोरावरती पुन्हा एकदा निवडून द्या, उर्वरित कामे मला करू द्या. असे म्हणत प्रचार सुरू केला आहे.
मागील महापालिका निवडणुकीत मी राजकारणातच नवखा होतो. पण प्रभाग सात मधील सुज्ञ मतदारांनी भाजपावर विश्वास ठेवण्याबरोबर माझ्यासारख्या राजकारणात नवख्या उमेदवाराला साथ देऊन विजयी केले.त्याची उतराई म्हणून गेल्या काही वर्षात प्रभागातील अनेक कामांना प्राधान्य देण्यात गणेश माळी हे यशस्वी ठरले. त्यासाठी मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांची साथ लाभली. याच विकासकामांच्या जोरावर पुन्हा भाजपकडूनच निवडणूक मैदानात गणेश माळी हे उतरले आहेत. विकासकामांचा विचार करून मतदार पुन्हा आशीर्वाद देऊन विजयी करतील असा विश्वास गणेश माळी यांनी व्यक्त केला.
प्रभागात आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला असल्याने रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी यासह अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागले आहेत. अद्यापही काही समस्या प्रलंबित आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला सर्वतोपरी निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली असल्याचे माळी यांनी सांगितले. आमदार डॉ. खाडे यांच्या माध्यमातून हा निधी प्रभागाला उपलब्ध होईल, असा विश्वास माळी यांना आहे.
गोपनीय खबऱ्याशी बोलताना उमेदवार गणेश माळी म्हणाले, गेल्या पाच वर्षांपूर्वी प्रभागातील काही भागात दयनीय अवस्था निर्माण होत होती. त्यावर मार्ग काढण्यात यशस्वी ठरलो आहोत. भविष्यातही जनतेला कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही, याची पूर्णता काळजी घेऊ. ‘ जनतेच्या समस्या, त्याच आमच्या समस्या’ या तत्त्वाने वाटचाल करून प्रभागातील विकासाला न्याय देऊ. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी यावेळी भाजपाला साथ आणि विकासाला मत द्यावे, असे आवाहन गणेश माळी यांनी केले आहे.

