• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचारात भाजपा पुढे, पॅनल विजयी करण्याचा निश्चय केल्याची कार्यकर्त्यांची माहिती..!

Admin by Admin
January 12, 2026
in राजकीय
1 min read
0
प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचारात भाजपा पुढे, पॅनल विजयी करण्याचा निश्चय केल्याची कार्यकर्त्यांची माहिती..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलने आक्रमक पवित्रा घेत प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजपच्या चारही उमेदवारांनी प्रभागात भव्य पदयात्रा आणि रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ज्यामुळे प्रभागात सध्या भाजपमय वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक कृष्ण वायदंडे, योगिता परशुराम राठोड, मीनाक्षी सदाशिव पाटील, संजय सुरगोंडा पाटील ह्या चारही उमेदवारांनी प्रभागातील काना- कोपऱ्यात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर दिला आहे.

‘प्रत्येक घरापर्यंत भाजपचा विचार पोहोचवण्यासाठी उमेदवार घरोघरी जात आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून उमेदवारांचे स्वागत केले. प्रभाग ८ मधील भाजपच्या या झंझावाती प्रचारामुळे महाविकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप उमेदवारांनी निर्माण केलेला प्रभाव पाहता आगामी काळात येथे मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे.

विकास प्रभागाचा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे पॅनेल कटीबद्ध आहे,” असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला. येणाऱ्या काही तासात भाजप आपला प्रचाराचा वेग आणखी वाढवणार असल्याची माहिती मिळत आहेत. या वेगवान प्रचारामुळे प्रभाग ८ मध्ये भाजपचे पारडे जड झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

Previous Post

सौ.मालुश्री महावीर खोत यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Next Post

कामाच्या जोरावर मी पुन्हा मैदानात – भाजपा उमेदवार गणेश माळी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कामाच्या जोरावर मी पुन्हा मैदानात – भाजपा उमेदवार गणेश माळी

कामाच्या जोरावर मी पुन्हा मैदानात - भाजपा उमेदवार गणेश माळी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group