
- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज शहरांमधील राजकीय वातावरण सध्या तापू लागले असल्याने निवडणुकीला भलत्याच प्रकारचा रंग चढू लागला आहे. यामध्ये आज सोमवारी दुपारी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या निवासस्थानाजवळ लोकांची गर्दी दिसत असल्याने अभिजीत हारगे पाहण्यासाठी गेले. तेथे पैसे वाटत असल्याचा प्रकार दिसल्याने अभिजीत हारगे यांनी निवडणूक आयोगाचे सर्वेक्षण फिरते पथक व पोलीस प्रशासनाला त्याची तातडीने माहिती दिली. यानंतर आमदार नायकवडी व श्वेतपद्म कांबळे यांचे कार्यकर्ते अभिजीत हारगे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी अभिजीत हारगे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, त्यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते व त्यांचे अंगसंरक्षक हे माझ्या अंगावरती धावून आले. पोलीस बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप अभिजीत हारगे यांनी केला असल्याने निवडणूक आयोगाच्या संपूर्ण नियोजनाचा धज्ज्या उडाल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या ठिकाणी घडलेला प्रकार चित्रीकरण करण्याकरिता असलेला निवडणूक आयोगाचा कर्मचारी अथवा प्रशासनाकडून कोणतीही उपलब्धी नसल्याचे दिसून आले.


