खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मिरज येथील प्रचार शुभारंभापूर्वी उद्योजक शरद जाधव व प्रभाग क्रमांक ४ चे उमेदवार शिशिर जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन हितगुज केले. चहापाणी कार्यक्रमानंतर जाधव कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित दादा यांचे पुष्पगुच्छ देऊन मिरजेच्या प्रसिद्ध असलेल्या सतारची प्रतिकृती भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी अजितदादा यांनी शरद जाधव यांच्या कुटुंबीयांशी गप्पागोष्टी करून हितगुज करीत संवाद साधला. तसेच प्रभागात सुरू असलेल्या प्रचाराच्या संदर्भात माहिती घेतली. उद्योजक व प्रभाग चारचे पॅनल प्रमुख शरद जाधव यांचे चिरंजीव शिशिर जाधव, सम्राट जाधव, मिरजेचे राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर किशोर दादा जामदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्ते, शरद दादा युवा मंचचे कार्यकर्ते जमले होते. अनेक कार्यकर्त्यांनी अजित दादांबरोबर सेल्फी आणि फोटो घेतला.

