• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गृह मंत्रालयाचा इशारा; सायबर ठगांनी शोधली नवी पद्धत, फोनमधील ‘ही’ सेटिंग्ज त्वरित बदला, अन्यथा…

Admin by Admin
January 9, 2026
in क्राईम
1 min read
0
गृह मंत्रालयाचा इशारा; सायबर ठगांनी शोधली नवी पद्धत, फोनमधील ‘ही’ सेटिंग्ज त्वरित बदला, अन्यथा…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

देशात सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर ठग आता फेक लिंक किंवा बनावट अ‍ॅप्सच्या माध्यमातून नव्हे, तर मोबाईलमधील एक सर्वसामान्य फीचर वापरून लोकांची फसवणूक करत आहेत.

या नव्या प्रकाराला कॉल फॉरवर्डिंग स्कॅम असे म्हटले जाते. यामुळे बँक खात्यांपासून सोशल मीडिया अकाउंटपर्यंत सर्व काही धोक्यात येऊ शकते.

या गंभीर धोक्याबाबत गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या Indian Cyber Crime Coordination Centre (I4C) ने देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.

काय आहे कॉल फॉरवर्डिंग स्कॅम?

कॉल फॉरवर्डिंग हे मोबाईलमधील एक फीचर आहे. युजर स्वतः येणाऱ्या कॉल्स दुसऱ्या नंबरवर वळवू शकतो. मात्र, सायबर ठग याच फीचरचा गैरवापर करून लोकांचे कॉल आणि OTP स्वतःकडे वळवत आहेत. I4C च्या माहितीनुसार, ठग लोकांना फसवण्यासाठी अत्यंत साधी आणि विश्वासार्ह पद्धत वापरत आहेत.

कसा रचला जातो कट?

या फसवणुकीची सुरुवात बहुतेक वेळा एका साध्या कॉल किंवा SMS पासून होते. ठग स्वतःला कुरिअर कंपनी, डिलिव्हरी एजंट किंवा सर्व्हिस प्रतिनिधी म्हणून ओळख करून देतात. ते सांगतात की, तुमच्या नावावर पार्सल आले आहे, डिलिव्हरीमध्ये अडचण येत आहे किंवा एखादी माहिती अपडेट करायची आहे. विश्वास बसावा म्हणून ते SMS पाठवतात आणि समस्या सोडवण्यासाठी USSD कोड डायल करण्यास सांगतात.

USSD कोड म्हणजे धोका

हे USSD कोड बहुतेक वेळा 21, 61 किंवा 67 या आकड्यांनी सुरू होतात. जसेच युजर हा कोड डायल करतो, त्याच्या फोनमधील Call Forwarding सक्रिय होते. याचा अर्थ असा की, बँकेकडून येणारे OTP, व्हेरिफिकेशन कॉल आणि अलर्ट कॉल… हे सर्व थेट सायबर ठगांच्या फोनवर पोहोचू लागतात.

OTP गेल्यावर काय होते?

एकदा OTP आणि कॉल्स ठगांकडे गेले की, बँक खात्यातून पैसे काढणे, WhatsApp, Telegramसारखी अकाउंट्स हॅक करणे यांसारख्या गोष्टी होऊ शकतात. अनेक वेळा युजरला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते, तोपर्यंत खात्यातील पैसे गायब झालेले असतात.

I4C चा इशारा: लिंक नाही, अ‍ॅप नाही… तरीही धोका

या स्कॅमची सर्वात धोकादायक बाब म्हणजे, कोणत्याही लिंकवर क्लिक करावी लागत नाही, कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करावे लागत नाही. फक्त एक कोड डायल करणे पुरेसे असते. म्हणूनच I4C ने लोकांना USSD कोडबाबत विशेष सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

संशय असल्यास लगेच काय करावे?

जर कोणालाही शंका वाटत असेल की, त्यांच्या फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग चुकीने सुरू झाली आहे, तर तात्काळ खालील कोड डायल करावा:

##002#

हा कोड डायल केल्यास, सर्व प्रकारची Call Forwarding बंद होते. कॉल पुन्हा थेट युजर्सच्या फोनवर येऊ लागतात.

Previous Post

मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव, प्रभाग क्रमांक ४ चे उमेदवार शिशिर जाधव यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार देणार सदिच्छा भेट..! मिरजेतील महाराणा प्रताप चौकात उद्या सभा.!

Next Post

सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेत लॉकर फोडून कोट्यावधींचा ऐवज लंपास

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेत लॉकर फोडून कोट्यावधींचा ऐवज लंपास

सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेत लॉकर फोडून कोट्यावधींचा ऐवज लंपास

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group