• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड येथे सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Admin by Admin
November 18, 2025
in क्राईम
1 min read
0
कुपवाड येथे सराईत गुन्हेगारावर गोळीबार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कुपवाडमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीतून सराईत गुन्हेगार महेश ऊर्फ पिल्या आनंदा पारछे (वय 28, रा. सिद्धनाथ कॉलनी, भारत सूत गिरणीजवळ, कुपवाड) याच्यावर दोन सराईत गुन्हेगारांनी गोळीबार केला.

डाव्या मांडीला गोळी लागून पारछे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि. 17) मध्यरात्री घडली. घटनेनंतर कुपवाड पोलिसांनी तत्काळ हालचाली करत अवघ्या चार तासांत हल्लेखोरांना अटक केली.

राहुल सुभाष माने (वय 34, रा. संकल्पनगर, बामणोली ता. मिरज) व गणेश सदाशिव खोत (वय 35, रा. शांत कॉलनी, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

जखमी पारछे व हल्लेखोर माने आणि खोत हे मित्र आहेत. मध्यरात्री तिघेही भारत सूत गिरणी चौकातून मोटारीतून (एमएच 10 ईआर 8262) कुपवाडकडे जात होते. संशयित राहुल माने व गणेश खोत या दोघांचा महेश पारछे याच्यासोबत पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला. यावेळी गणेश याने महेश याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून ‘तुला जिवंत ठेवत नाही’ अशी दमदाटी करून धमकी दिली. यावेळी संशयित राहुल याने रागाच्या भरात महेश याच्या दिशेने गोळी झाडली, ती महेशच्या डाव्या मांडीला लागली. यात तो गंभीर जखमी झाला.

याबाबतची माहिती मिळताच सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यासह कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांना जेरबंद केले. हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली 15 लाख रुपये किमतीची आलिशान मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

गुन्हे दाखल

संशयित राहुल व गणेश तसेच जखमी महेश हे सराईत गुन्हेगार आहेत. पारछे याच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर माने व खोत या दोघांविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

भाजपचा मिरज शहरातील नाराज कार्यकर्ता इद्रिस नायकवडींच्या गळाला..? थेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट..!

Next Post

डॉ. रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत, भाजपचे नेते‌ ॲड. अष्टेकर यांचा घरचा आहेर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
डॉ. रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत, भाजपचे नेते‌ ॲड. अष्टेकर यांचा घरचा आहेर..!

डॉ. रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत, भाजपचे नेते‌ ॲड. अष्टेकर यांचा घरचा आहेर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group