• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजपचा मिरज शहरातील नाराज कार्यकर्ता इद्रिस नायकवडींच्या गळाला..? थेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट..!

Admin by Admin
November 17, 2025
in राजकीय
1 min read
0
भाजपचा मिरज शहरातील नाराज कार्यकर्ता इद्रिस नायकवडींच्या गळाला..? थेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शहरातील भाजप मधील नाराज कार्यकर्ता राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेस पार्टीच्या गळाला लागल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपकडून उमेश हारगे नावाच्या कार्यकर्त्याला प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली होती. पराभवानंतरही आज अखेरपर्यंत उमेश हारगे हे माजी मंत्री,आमदार डॉ. सुरेश खाडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. अलीकडच्या काळात भाजपमध्ये गटाचे राजकारण सुरू झाल्याचे उमेश हारगे यांच्याकडून वारंवार मित्रमंडळींमध्ये चर्चेदरम्यान सांगण्यात येत होते.

यापूर्वी भाजपचे ईश्वर जनवाडे, संदीप कबाडे यांनी इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आज आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासोबत मुंबई येथील देवगिरी ह्या शासकीय निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांची ईश्वर जनवाडे व उमेश हारगे यांनी भेट घेतली.

या भेटीदरम्यान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नेते अजित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती इद्रिस नायकवडी यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून जाहीर करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे यांच्यासहित इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सां.मि.कु महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत..!

Next Post

कुपवाड येथे सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड येथे सराईत गुन्हेगारावर गोळीबार

कुपवाड येथे सराईत गुन्हेगारावर गोळीबार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group