• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सां.मि.कु महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत..!

७८ प्रभागांसाठी उमेदवारांची क्षमता, लोकमान्यता आणि जनसमर्थनाची स्थिती जाणून घेण्यासाठी चाचपणी करण्याच्या सूचना

Admin by Admin
November 17, 2025
in राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सां.मि.कु महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली महापालिकेच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी हळूहळू रंगत असून भाजपने आतापासूनच ७८ जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महायुतीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या निवडणुका जरी लांब असल्या तरी भाजपने तयारी आत्ताच सुरू केली आहे. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार आणि जयश्री पाटील यांना ७८ प्रभागांसाठी उमेदवारांची क्षमता, लोकमान्यता आणि जनसमर्थनाची स्थिती जाणून घेण्यासाठी चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीबाबत ते म्हणाले, “महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. एकत्र येण्याची आमची इच्छा आहे आणि योग्य जागांवर समन्वय साधला जाईल.

काँग्रेसचा पराभव निश्चित.?

पलूस नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोबत चर्चा सुरू असून सर्वेक्षणात भाजपला २७टक्के आणि राष्ट्रवादीला १७ टक्के कौल मिळाल्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली. विटा नगरपालिकेतही महायुतीमध्ये कोणताही वाद नसून एक पक्षाचा नगराध्यक्ष तर दुसऱ्याच उपनगराध्यक्ष असा पर्याय अंतिम केला जाणार आहे. नगरपालिकांच्या सर्व निवडणुकांत महायुती एकत्र राहील आणि काँग्रेसचा पराभव निश्चित होईल, असा ठाम विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

Previous Post

मिरजेतील पोलिसाने फिल्मी स्टाईलने पकडले; कारागृहातून पळालेल्या कैद्याला पोलिसी हिसका..!

Next Post

भाजपचा मिरज शहरातील नाराज कार्यकर्ता इद्रिस नायकवडींच्या गळाला..? थेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपचा मिरज शहरातील नाराज कार्यकर्ता इद्रिस नायकवडींच्या गळाला..? थेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट..!

भाजपचा मिरज शहरातील नाराज कार्यकर्ता इद्रिस नायकवडींच्या गळाला..? थेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group