• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील पोलिसाने फिल्मी स्टाईलने पकडले; कारागृहातून पळालेल्या कैद्याला पोलिसी हिसका..!

Admin by Admin
November 17, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील पोलिसाने फिल्मी स्टाईलने पकडले; कारागृहातून पळालेल्या कैद्याला पोलिसी हिसका..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली कारागृहातून पळालेला कैदी उदगाव बसस्थानकात आढळून आल्याने मिरज पोलिसांनी त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. अशातही हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना मिरज व जयसिंगपूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने या कैद्याला आज (दि.१७) सकाळी १० च्या सुमारास ताब्यात घेतले.

अर्ध्या तासाच्या थरारानंतर मिरज व जयसिंगपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून मिरजला रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. ही घटना पाहण्यासाठी उदगाव बसस्थानकावर प्रचंड मोठी गर्दी झाली होती.

सांगली येथील कारागृहामध्ये खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेला अजय दाविद भोसले (वय 35 वर्षे, रा.संजय गांधी झोपडपट्टी, तासगाव वेस, मिरज) हा सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता. या घटनेबाबत सांगली पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगली, मिरज पोलिसांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मिरज पोलिसांना सोमवारी सकाळी आरोपी उदगाव बस स्थानक या ठिकाणी असल्याचे कळाल्यानंतर याठिकाणी मिरज पोलीस ठाण्याचे दीपक परीट यांनी येऊन जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने कैदी भोसले याला ताब्यात घेतले.

सांगली जेलमध्ये खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेला अजय दाविद भोसले (रा.मिरज) हा 13 नोव्हेंबररोजी सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता. सांगली व मिरज पोलीस भोसले यांच्या मागावर होते. आरोपी भोसले हा पोलिसांना चकवा देत फरार होता. मिरज गुन्हे प्रकटीकरण पथकास शोधण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. सोमवारी मिरज पोलिसांना आरोपी भोसले हा उदगाव बसस्थानकावर असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि अण्णासाहेब गोदकर यांनी पो.शि.दीपक परीट यांना या ठिकाणी जाण्यास सांगितले दीपक परीट यांनी या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता आरोपी अजय भोसले हा बस स्थानकावर मिळून आला.

दीपक परीट यांना पाहून आरोपी भोसले हा पळून जाण्याच्या तयारीत होता. दीपक परीट यांनी आरोपी भोसले यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर तो पळून जाण्याचेही प्रयत्न करत होता. अशातच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस हवालदार निलेश मांजरे यांच्या मदतीने आरोपी भोसले यांना मिरज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपी भोसले याची वैद्यकीय तपासणी करून सांगली पोलीस ठाण्याकडे ताब्यात देण्यात आले आहे.

Previous Post

जतमध्ये राजकारण बदललं | भाजपचे माजी नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश.

Next Post

मोठी ब्रेकिंग | सां.मि.कु महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सां.मि.कु महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत..!

मोठी ब्रेकिंग | सां.मि.कु महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group