खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
अहिल्यानगरमध्ये गुरूवारी झालेल्या एमआयएमच्या सभेचे पडसाद आज उमटले. अहिल्यानगरमध्येच आज (रविवारी ता.12) जन आक्रोश मोर्चा झाला. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी एमआयएमच्या सभेत केलेल्या टीकेचा देखील समाचार घेतला. यावेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी, ***च्यांनो तुम्ही राणे आणि जगतापपर्यंत जाण्याआधी थडग्यात जाल, त्यावर आमच्याकडून भगवा आणि निळा झेंडा रोवला जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
काहीच दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये आय लव्ह यू महंमदमुळे वाद उसळला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आय लव्ह यू महादेव असा नारा भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दिला होता. ज्यानंतर राज्यभर आय लव्ह यू महादेवचे पोस्टर विविध ठिकाणी दिसले होते.
याच मुद्द्यावरून एमआयएमच्या सभेत खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह माजी खासदार इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. हिंदुत्त्वाचा कडवा पुरस्कार करणाऱ्या मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना डिवचण्यात आले होते.
येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हणत वारीस पठाण यांनी राणेंना थेट आव्हाने दिले. तर जलील यांनी नितेश राणेंचा ‘छोटासा चिंटू’तर संग्राम जगताप यांचा चिकनी चमेली उल्लेख केला होता. ज्यानंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या टीकेनंतर नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. तर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या शब्दात टीका केली आहे. यावेळी त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
पडळकर यांनी, आपल्या भाषणात बोलण्याच्या सर्व मर्यादा ओडांलताना ठोकाठोकिची भाषा वापरली. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आमदार संग्राम जगताप हे जिहादींचे बाप असल्याचे म्हणत एमआयएमच्या नेत्यांना फटकारले. तसेच दुसऱ्या देशामध्ये असे चालते का?, भडव्यांनो भारतातील महामानवांविषयी चुकीचे वक्तव्य कराल तर आमचे तरुण ठोकून काढतील, असेही ते म्हणाले.
मंत्री नितेश राणे यांच्या बद्दल केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, ***च्यांनो तुम्ही राणे आणि जगतापपर्यंत जाण्याआधी थडग्यात जाताल. तर त्यावर भगवा आणि निळा झेंडा रोवला जाईल. मुस्लिम हे हिंदू असून याबाबत जम्मू-काश्मीरचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद हे वारंवार सांगत आहेत. मात्र सध्याचे मुस्लिम कॉकटेल असल्याचेही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
तर यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करत, फाळणी वेळी बाबासाहेबांनी सांगितले होते की सर्व मुस्लिम समाजाला पाकिस्तानात पाठवून द्या आणि तेथील हिंदू इकडे बोलून घ्या. तसं झालं असतं तर आज आपल्याला मोर्चा काढायची वेळ आलीच नसती असाही दावा पडळकर यांनी केला आहे. तर ज्या लोकांना शहरांचे नामांतरण मान्य नाही त्यांच्यावर कारवाई करा, ज्या ज्या ठिकाणी अहिल्यानगर ऐवजी अहमदनगर लिहिले असेल त्यांचे शॉपक्ट लायसन रद्द करा, अशीही मागणी भाजपचे आमदार पडळकर यांनी केली आहे.