खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
पंधरा दिवसांपूर्वी 26 लाख रुपये किंमतीची एमडी पावडर पकडणाऱ्या उल्हासनगर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा 32 लाखाची एमडी पावडर पकडली आहे.
अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव दर्गा परिसरात एक व्यक्ती एम डी पावडर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार राजेंद्र थोरवे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, अशोक पवार, पोलिस अंमलदार चंद्रकांत सावंत, गणेश गावडे, योगेश वाघ, रितेश वंजारी, राजेंद्र थोरवे, विक्रम जाधव, अविनाश पवार यांनी सापळा रचला. त्यानुसार पथकाने छापा टाकून फरहान हबीब चौधरी याला शिताफीने पकडण्यात आले. त्याच्याकडून 161 ग्रॅम एमडी, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 32 लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. 645/2025 भा. दं. सं. NDPS Act कलम 8(C), 22(C) अन्वये दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उल्हासनगर गुन्हे शाखा करीत आहे.