खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरजेत विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान मणेर, रोझम मणेर, निशाद सतारमेकर, शुभम तबकरे (सर्व रा. मिरज) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
मिरज शहरात मोहरमनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले होते. तसेच इराणचे अली खोमेनिया यांचे फोटो एलईडीवर लावण्यात आले होते. ही मिरवणूक काढताना संबंधितांनी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही परवानगी काढली नव्हती, म्हणून मिरज शहर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.